मुंगी ची माहिती लिहा
Answers
Answered by
27
Answer:
मुंगी हा एक सहा पायाचा अतिशय छोटा कीटक आहे. मुंग्या नेहमी समूहामध्ये राहतात.
लाल व काळ्या अश्या दोन प्रकारच्या मुंग्या असतात. त्यांच्या निवासस्थानाला वारूळ असे म्हणतात. ते सहसा मातीचे असते. परंतु काही प्रजातीतील मुंग्या झाडावर वेगळ्या साहित्याचा वापर करूनही वारुळे बांधतात.मुंगी आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा वजन उचलू शकते.
Answered by
6
Answer:
Wishing getting lots of thanks from u dear...❤️✨✨❤️☺☺❤️✨✨❤️
Explanation:
मुंगी : एक अद्भुत विश्व’ हे पुस्तक म्हणजे प्रदीपकुमार माने यांच्या जिज्ञासेचे आणि परिश्रमाचे उत्तम उदाहरण आहे. माने हे खरेतर तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी. परंतु विज्ञानामध्ये रुची असल्यामुळे ते डिस्कव्हरी वाहिनीवरील विज्ञानविषयक मालिका पाहत असताना, मुंगी या कीटकाच्या सामाजिक वागणुकीबाबतचा भाग पाहून अचंबित झाले. त्यांना मुंगीच्या वागणुकीसंबंधीची माहिती जाणून घ्यावयाचा ध्यास लागला. त्यातून त्यांनी या इवल्याशा कीटकावर ज्या अनेक नामवंत शास्त्रज्ञ, संशोधकांनी संशोधनाच्या आधारे लिहिलेल्या पुस्तकांचे आणि शोध-पत्रिकांचे खोलवर वाचन केले. या वाचनाने, मुंग्यांच्या वैविध्यपूर्ण समाजातील घटकांच्या वागणुकीतील आश्चर्यजनक गोष्टी इतरांनाही माहिती व्हाव्यात असे तीव्रतेने वाटल्यामुळे त्यांनी हे पुस्तक लिहिले.
या पुस्तकात मुंग्यांविषयी कोणतीही कीटकशास्त्रीय माहिती दिलेली नाही, कारण तो या पुस्तकाचा विषय नाही. विषय आहे, मुंग्यांची सामाजिक वागणूक आणि त्यातून त्यांनी या पृथ्वीतलावर गाजविलेले अधिराज्य!
माने यांनी विषय विवेचनाच्या सोयीसाठी, विवेचनाचे आठ भाग केले आहेत. ‘मुंगी एक अतिसामाजिक जीव’ या भागामध्ये त्यांनी मुंग्यांच्या सामाजिक घडण आणि त्यांच्या कौटुंबिक संबंधांची प्राथमिक माहिती दिली आहे. एका विशिष्ट जातीच्या मुंग्यांचा समाज, एका सजीवाच्या शरीरासारखा एकवटून कार्यरत झालेला असतो. यालाच इंग्रजी भाषेत 'सुपरऑरगॅनिझम्' म्हटले जाते. श्रीमान लेखकांनी दुसऱ्या भागामध्ये मुंग्यांच्या कार्यप्रणालीबद्दल - एक मेंदू, संदेशवहनाचे विविध प्रकार, वसाहतीचे (वारुळाचे) संरक्षण, वसाहत युध्द, रासायनिक शस्त्रे, कामकऱ्यांच्या नेमणुकीची पध्दत, कार्यक्षमता आणि दक्षता, वास्तुकला, विणकाम, पशुपालन, शेती, लष्कर, अन्नसाठा, मुंग्या विशेष आदी विस्तारपूर्वक आणि मनोरंजक माहिती दिलेली आहे. श
Similar questions