माजी aaji
निबंध लेखन
Answers
Explanation:
i hope you got your answer
Answer:
Explanation:
माझी आजी आता वृद्धत्वाकडे झुकू लागली आहे. केस चंदेरी झाले आहेत. सर्व कांती सुरकतून गेली आहे. मान थरथरत आहे परंतु कामाची चपलाई आणि अटकर बांध्यामुळे अजुनही ती सुंदर दिसते. माझी आजी खूप प्रेमळ आहे. घरातील सर्व कामे अजुन ती करु शकते. तीची दृष्टी अजुनही स्वच्छ आहे त्यामुळे निवडणे, टिपणे, शिलाईकाम यात तिचा हातखंडा आहे. माझ्या आईने मला मारले की ती कडक शब्दात आईची समजूत काढते. ती सांगते लहान मुलांची मने फुलासारखी नाजूक असतात. म्हणुन त्यांना फुलांप्रमाणे जपायला हवे. एकदा ती जर कोमेजली तर पुन्हा फुलणे कठीण त्यांच्या भावना जपायला हव्यात.
ज्या प्रमाणे कुंभार नाजुकपणे मातीला आकार देतो तसे मुलांच्या मनावर संस्कार व्हावेत. त्यांना मोठ्यांचा धाक हवा भीती नको. अशी ही माझी निरक्षर आजी तत्ववेत्यांनाही लाजवेल अशा विचारांची आहे. तिला वावगे वागलेले अजिबात खपत नाही. खोड्या व चुकांना ती माफ करत नाही. कामात व अभ्यासात अळमटळम ती चालवून घेत नाही. सर्व कामे वेळच्यावेळी व्हावी असा तिचा दंडक असतो. माझी आजी भल्या पहाटे उठते. सडा रांगोळी करुन, स्नानानंतर देवाचा जप सुरु करते. आईला कामात मदत करुन देवळात जाऊन येते. देवळातील सर्व पारायणाना नित्य जाते. हाताखालच्या मोलकरणीला देखील ती मुलीप्रमाणे पहाते तिला काही त्रास असेल तर आजी मदत करते.
आम्हा नातवंडापैकी कोणी आजारी असेल तर रात्रभर उशाशी बसुन राहते. वेळच्यावेळी खाणे, औषध देवून आजाराला पळवून लावते. संध्याकाळी मात्र ती फक्त आमच्याच बरोबर असते. शाळेतून परतल्यावर हातपाय धुतल्यावर ती ओटयावर बसून आमच्या कडून सायंप्रार्थना, परवचा म्हणून घेते. नंतर तिच्या गोष्टींना रंग चढतो. महाभारत, रामायणातील कथा सांगुन ती सदाचार व सूविचारांचे जणू काही धडेच देते. शिवरायांच्या पराक्रमाच्या, कृष्णाच्या बाललीलांच्या आणि पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीच्या कथा ऐकताना आमचे भानच हरपून जाते. नवरसांची ओळख होते. आम्ही इतके
तल्लीन होऊन जातो की आईच्या हाकेला ‘ओ दयायचेही भान राहत नाही. शाळेतून आल्यानंतर आजी घरात नसेल तर मन बेचैन होते. अशी ही आमची आजी अनेक पावसाळे रिचवून, पचवून दूनियेच्या सर्व अनुभवांत तज्ञ आहे. त्यामुळे घरातील सर्व लोक तिच्यावरच अवलंबून असतात. माझी आजी लोण्यांहून मऊ, नरम आहेच पण प्रसंगात वज्राहूनही कडक आहे. तिच्या शिस्तीत वाढलेली व्यक्ती जगात सर्वपरिपूर्ण म्हणूनच संबोधली जाते. तिच्या कठोरपणात सर्व लोकांना नमवण्याचे सामर्थ्य आहे. प्रसंगावधान राखून ती वागेलच परंतु वेळीच हात उगारायला देखील मागेपुढे पाहत नाही.
अशी ही आमची आजी आम्हाला आईपेक्षाही प्रिय आहे. फावल्या वेळात आमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाऊ, लोणची, मुरंबे, करुन बरण्या भरुन ठेवते. सुटीला आजोळी गेल्यावर आमरस, आम्रपोळी खावी ती आजीच्या हातचीच. माझी आजी म्हणजे देवाघरचे देणेच आहे म्हणून आम्ही सर्व नातवंडे तिला जीवापाड जपतो.