माझी आई या विषयावर निबंध लिहा
Answers
‘आ’ म्हणजे ‘आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’ यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’ . लहान मुल जेव्हा पहिला शब्द बोलतो तो म्हणजे आई. आई म्हणजे ममता, वात्सल्य, करूणा, प्रेम. आईतच आहे सामावलेले पूर्ण विश्व. ‘आई म्हणजे साक्षात देवाचे रूप.’ जर देवाचे दर्शन या जन्मात करायचे असेल तर ते तीर्थरूप आईच्या रूपातच होते. आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा, मुलाची पहिली गुरू. आई असंख्य वेदना आपल्या बाळासाठी सहन करते. पुष्कळश्या गोष्टींचा त्याग करून आपल्या लेकरांचा बिना परतावा सांभाळ करते, चांगले संस्कार देते. बालमनाला चांगले वळण लावते. आईची ममता अफाट आहे. जिथे मी चुकते तिथे ती मला शिक्षा करते. आजारी पडलो तेव्हा ती माझी डाॅक्टर होते. मोठया बहिणीप्रमाणे सर्व हट्ट पूर्ण करते व गुरूप्रमाणे चांगली शिकवण देते. माझ्या जीवनात आई एक अविभाज्य घटक आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत ती आपली जबाबदारी पार पाडत असते व कधीही कोणापासून कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. आईशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. मला माझी आई फार आवडते. तिचे हे ऋण मी या जन्मात तरी फेडू शकणार नाही.