होळी या सणांवर निबंध लिहा
Answers
होळी हा विशेषतः उत्तर भारतामध्ये आनंदाने व उत्साहाने साजरा होणारा सण आहे. होळीलाच धुलीकोत्सव, रंगपंचमी, धुळवड, फाल्गुन पोर्णिमा, शिमगा, होलिकादहन, रंगोत्सव म्हटल्या जाते. हा सण फाल्गुन पोर्णिमेपासून तर पंचमीपर्यंत पाच दिवस साजरा केला जातो. वसंत ऋतूतील साजरा केला जाणारा या भारतीयांच्या होळीसणाच्या पहिल्या दिवशी होळी दहन केल्या जाते. होळीची प्राचीन अशी दंतकथा आहे. विष्णुचा परमभक्त प्रल्हाद याला हिरण्यकश्यप राजाने होलिकेच्या मांडीवर बसून अग्निच्या चीतेवर बसविले. परंतु, परमभक्त प्रल्हाद विष्णुचा नाम जप करत असल्यामुळे वाईट विचार करणाऱ्या होलिका जिला अग्निदेवतेचे वरदान होते ती स्वतः त्यात जळून खाक झाली व भक्त प्रल्हाद वाचलेत. तेव्हापासून वाईट विचारांना नष्ट करण्यासाठी होलीकादहन म्हणजेच होळी साजरी केल्या जाते. दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंगीबिरंगी गुलाल लावून रंगाचा उत्सव साजरा केला जातो व म्हणतात, ‘बुरा न मानो, होली हे!’
HOPE IT HELPS U ✌️✌️