India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

दिवाळी या सणांवर निबंध लिहा

Answers

Answered by IshitaJaiswal
37

 \huge{ \bold{ \red{ \underline{ \: hey \: mate}}}}


HERE IS YOUR ANSWER :-




 \huge{ \bold{ \green{ \underline{  \: answer}}}} >

•‘माझा आवडता सण’ असा विषय जर परीक्षेत निबंधासाठी आला तर बहुतेक सर्वचजण ‘दिवाळी’ या विषयावरच निबंध लिहितात. काहींची आवड-निवड वेगळीही असू शकते. काही जण गणेश चतुर्थी, मकरसंक्रांत, नवरात्र, दसरा अशा सणांविषयी माहिती किंवा निबंध लिहितात. खालील निबंधात मी ‘माझा आवडता सण’ दिवाळी या विषयावर निबंध लिहिला आहे. यावरून तुम्ही तुमच्या आवडत्या सणांबद्दल माहिती लिहू शकता. आम्ही माझा आवडता सण गणेश चतुर्थी या विषयावर सुद्धा निबंध लिहिला आहे, तुम्ही तो वाचू शकता.



•अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी हा सण असतो. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. दीपावलीच्यावेळी अनेक दिव्यांची किंवा दीपांची झगमगाट आणि लख्ख असा प्रकाश सगळीकडेच पाहायला मिळतो. त्याचबरोबर सगळीकडे रंगबेरंगी फटाके आणि सर्वांच्या घरोघरी विद्युत रोषणाई,आकाशकंदील पाहायला मिळतात. त्यामुळेच तर या सणाला दीपावली असे म्हणतात. दिवाळी हा सण जवळपास तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाची सुरुवात फार प्राचीन काळापासून झाली आहे. असे पुर्वजांना आढळले आहे. परंतु काहीलोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून श्री प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले त्यादिवशी दिवाळी हा सण साजरा करतात. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा करतात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी एका वेगळ्याच आनंदात हा सण येतो. यावेळी शेतकरीसुद्धा सुखावलेले असतात कारण त्यांच्या हाती नवीन पिके आलेली असतात. त्यामुळे शेतकरी पण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीच्या वेळेस लक्षमीपूजनाच्या दिवशी शेताची आणि शेतीच्या अवजारांची ते पूजा करतात. गुरांचीसुद्धा पूजा करतात आणि त्यांना गोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला आपल्या भारतात बहुतांश सर्वांनाच सुट्टी असते.





Hopes help.








 \huge{ \pink{  \: thanks}}....
Answered by Mandar17
27

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, आनंदाचा सण, उत्साहाचा सण. दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. अश्विन महिन्यात अमावस्येला दिवाळीचा सण येतो. यालाचा प्रकाशाचा सण असेसुद्धा म्हणतात. दिवाळीची पौराणिक कथा अशी आहे की, चैदा वर्षाचा वनवास संपवून जेव्हा श्रीराम प्रभु सीता मातेसह अयोध्यामध्ये परतले तेव्हापासून दिवाळी साजरी केल्या जाते. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा हा पाच दिवसांचा सण संपूर्ण देशात आनंदाने साजरा केला जातो. सगळीकडे रंगीबिरंगी रांगोळया, आकाशदिवे, आंब्याच्या पानांचे तोरण, फुलांचे हार, घरात व घराबाहेर तेलाचे दिवे तसेच रोशनाई केली जाते. चकली, चिवडा, लाडू, पेढे यासारखे मिष्टान्न बनविल्या जाते. लहान मुलांना कपडे, फटाके घेतल्या जातात. तसेच शाळेला सुट्टी असल्यामुळे या दिवसात मुले धमाल करतात. धार्मीक महत्व म्हणजे दिवाळीची सुरवात वसुबारस या पहिल्या दिवसापासून होते, आपली संस्कृती कृषीप्रधान असल्यामुळे गाय व वासराची पुजा केली जाते. दुसरा दिवस म्हणजे धनत्रयदशी या दिवशी धन्वंतरी देवीची पुजा करतात, नंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी लवकर उठून सुंगधी उटणे लावून आंघोळ केल्या जाते व लक्ष्मी पूजन या दिवशी लक्ष्मी देवीची आराध्या करून दिव्यांची रोशनाई केल्या जाते. नंतर येतो तो पाडवा यात एकमेकांना छान उपहार दिल्या जाते. तसेच भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते. भारतामध्ये हा सण सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येवून साजरा करतात.

Similar questions