प्रदूषण या विषयावर निबंध लिहा
Answers
आजच्या 21 व्या शतकात माणूस खूप प्रगती करीत आहे. माणसाने इतकी प्रगती केली की, चंद्रावर जाणे ही काही फार मोठी गोष्ट राहिली नाही. पण या प्रगतीच्या वाटेवर समोर जाताना मागे राहत आहे तो भला मोठा प्रश्न म्हणजेच प्रदूषण.... हो हो प्रदूषण. कारखाने वाढलेत, गावांची शहरे झालीत, मोठमोठाल्या इमारती, चार चाकी वाहने वाढलीत ही प्रगती होत असतांना निसर्गाचा मोठया प्रमाणात ऱ्हास
होत असतांना दिसत आहे. झाडे कापली जात आहेत, शुद्ध हवा नाहीशी होवू लागली. ‘शहराबाहेर चला शुद्ध हवा मिळेल’ असे लोक म्हणू लागले‐‐‐ हिच का आपली प्रगती? जागोजागी कचरा, कारखान्यातील सांडपाण्यामुळे नदी, तलावातील पाणी दुषित होत आहे. गाडयांचे कर्कश आवाज, प्रत्येक कामातील लाउड स्पीकरच्या आवाजामुळे तसेच फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढलेले आहे. फटाक्यातील धूर, गाडयांच्या धुरामुळे वायू प्रदूषण वाढलेले आहे. प्रदूषण रोखायचे कसे ? नुसते संकल्पना करून चालणार नाही तर उपाययोजना अमंलात आणाव्या लागतील. आपल्या देशाला प्रदूषणाच्या शापातून मुक्त केले पाहीजे. हीच माझी सर्व देशवासीयांना विनंती आहे. आपण सर्व मिळून स्वच्छ प्रदूषण मुक्त भारत घडवू.

hope it HELPS u u ❤️❤️