माझी शाळा या विषयावर निबंध लिहा
Answers
माझ्या शाळेचे नाव ‘ज्ञानदिपीका’ आहे. नावाप्रमाणेच माझी शाळा निरंतर ज्ञान देण्याचे कार्य करते. माझ्या शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर आहे. येथे मोठे क्रिडांगण असून सभोवताली मोठमोठाले हिरवी झाडे आहे. छोटीशी बाग व खेळण्यासाठी घसरगुंडी व झुले आहेत. माझ्या शाळेतील शिक्षक व शिक्षीका अतिशय मृदूभाषी असून खूप चांगले आहेत. शाळेतील शिस्त व वेळेचे भान आम्हां सर्व मुलांना काटेकोरपणे पाळावे लागते. अभ्यासासोबतच विविध खेळ, कार्यक्रम आमच्या शाळेत राबविले जातात. जसे संतवाणी, निसर्गसहली, मैदानी खेळ, गमंतजमंत कार्यक्रम, स्नेहसंमेलन, निंबधस्पर्धा, वादविवाद स्पर्धा इ. ‘‘खरचं शाळा हे विद्येचे मंदिर आहे.” एक जागरूक नागरिक घडवण्याचे काम शाळा करीत असते. माझा जास्तीत जास्त वेळ शाळेतच जातो. मला माझी शाळा खूप आवडते.
Answer:
ही आवडते मज मनापासुनी शाळा |
लाविते लळा ही जसा माऊली बाळा ||
खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच होतो, म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलच्या जीवनात फार असते.
आमच्या शाळेत शिस्तीचे महत्व फार आहे, शाळेची पहिली घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत आलेली असली पाहिजेत, दुसरी घंटा होते तेव्हा आपापल्या वर्गात गेली पाहिजेत आणि तिस-या घंटेला प्रार्थना सुरू झाली पाहिजे असा आमच्या मुख्यराध्यापकांचा आग्रह असतो.
आमचे सर्व शिक्षक खूप मनमिळाऊ असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भागघेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. आमच्यासाठी खास खोखोचे प्रशिक्षणसुद्धाशाळेत चालते. मी स्वतः खोखोच्या संघात असून गेल्या वर्षी आम्हाला आंतरशालिय ढाल मिळाली होती. त्याशिवाय उन्हाळी सुट्टीत आमच्यासाठी पोहण्याची खासशिबिरे आयोजित केली जातात, आमच्या लहानमोठ्या सहली काढल्या जातात. मी दर वर्षी शाळेच्या सहलीला जाते.आईबाबांसोबत सहलीला जाणे आणि बरोबरीच्या मित्रांसोबत शाळेच्या सहलीला जाणे ह्यात खूप फरक आहे. मात्र शाळेच्या सहलीत फार मस्ती करून चालत नाही. मुले एकदा चेकाळली की कुणाचेच ऐकत नाहीत असा आमच्या सरांचा अनुभव आहे.
ह्या शाळेत मी आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे मला वाटते कारण इथेच मला खुप चांगले मित्र मिळाले. आमच्या शाळेचे ग्रंथसंग्रहालय आणि प्रयोगशाळाही अगदी अद्ययावत आहेत. म्हणूनच मला माझी शाळा खूप खूप आवडते.