पावसाळा या ऋतूवर निबंध लिहा
Answers
सर्व ऋतुमध्ये वर्षा ऋतु म्हणजे ‘पावसाळा’ पावसाळा मला सर्वात अधिक आवडतो. पावसाळयामध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली की, उन्हाळयातील उष्णतेचे दाह कमी होवू लागतो. सर्व पशु-पक्षी, शेतकरी बांधव पावसाळयाची आतुरतेने वाट बघत असतात. पावसाळयात नदी-नाले भरून वाहतात. सर्वदूर हिरवळ पसरते. सकाळी पक्ष्यांचा चिवचिवाट जणुकाही पावसाळयाचे स्वागतच करीत असतो. मोर रानात नृत्य करीत असतो. तर कधी इंद्रधनुष्य आकाशातून रंगीत छटा दाखवितो. हा ऋतू सर्वांना आनंद देणारा असतो. निसर्गाचे खरे सौंदर्य पावसाळयात दिसते. गरमागरम शेवभजी, काॅफीचा आनंद घेतघेत पावसांची रिमझिम, विजांचा कडकडाट ऐकण्याचा आनंद काही औरच असतो. लहान मुल तर पावसात फेर धरून नाचतात, कागदांची नौका करून खेळतात व म्हणतात
‘‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा ”
सर्वांना आनंद देणारा असा हा माझा आवडता ऋतु पावसाळा