India Languages, asked by TransitionState, 10 months ago

माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध, भाषण, लेख My Hobby Marathi Essay

Answers

Answered by AadilAhluwalia
59

माझा आवडता छंद

फावल्या वेळात विरंगुळा म्हणून लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे. वेगवेगळे साहित्य वाचणे हा माझा छंद आहे. पुस्तक आपले खरे मित्र असतात हे तर मी चांगलेच अनुभवले आहे. मी कविता, कादंबरी, नाट्य इत्यादी प्रकारचे साहित्य वाचन करते. मला वृत्तपत्र वाचायलासुद्धा आवडते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे,' वाचाल तर वाचाल. वाचनाने आपले सामान्य ज्ञान वाढते. पुस्तक आपल्यला बसल्या जागी जग फिरवू शकतो. वाचन ही खूप चांगली सवय असून मला त्याचा अभ्यासात खूप फायदा होतो. मी माझा हा वाचनाचा छंद जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.

Similar questions