Art, asked by mmorris8289, 7 months ago

माझी आवडती कला वर 10 लाईन्स लिहा. मराठीत

Answers

Answered by TanishkaManjrekar
4

विध्यपूर्ण पैलू उलगडून त्याच्या आयुष्यातील दु:खाची हलकी किनार आपल्यापर्यंत पोहचवण्याची पु.लं.ची शब्दकिमया काही औरच होती. याच पुस्तकातील 'नारायण' हे पात्र तर आपल्या मनाच्या कोपऱ्यात चिरकाल स्थान मिळवून जाते. तीच गोष्ट पु.लं.च्या 'गणगोत' पुस्तकाबाबतही सांगता येते. ही व्यक्तिचित्रे वाचत असताना कळत-नकळत ती आपल्या भोवतालची आसपासची वाटू लागतात. आता चाळ संस्कृती लोप पावते आहे. तो आपलेपणा, देवाणघेवाणीचे कार्यक्रम हे प्रकार ‘बटाट्याची चाळ' वाचताना अनुभवास येतात. तिथे जीवाला जीव देणारे अडीअडचणीला उपयोगी पडणारे शेजारी भेटतात. तसेच आपापल्या स्वभाव वैशिष्ट्यांनी आपला वेगळेपणा टिकवून ठेवणारे काही नमुनेदार व्यक्तीसुद्धा भेटतात. पु.लं. च्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक माणूस आपल्यापरीने वेगळा आहे. Read also : माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध

पु.लं. नी आपल्या आयुष्यात देश-परदेशात भरपूर प्रवास केला. या प्रत्येक प्रवासात त्यांनी भेटलेल्या माणसांचे वेगळेपण शोधले. ते त्यांच्या लेखनीत अवतरले. परदेशात भेटलेल्या माणसांच्या स्वभाववृत्तीच्या सूक्ष्म वर्णनासह त्या व्यक्तिरेखाही 'अपूर्वाई' 'पूर्वरंग', 'जावे त्याच्या देशा', इत्यादी प्रवासवर्णानांतून त्यांनी साकारल्या. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेला कोटी चंद्रप्रकाशाचा अनुभव युरोपातील काप्री बेटावर त्यांनी घेतला.

पु. लं. चे चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग, सर्वच गोष्टी लोकांना आनंद देणाऱ्या, ताजे-तवाने करणाऱ्या ठरल्या. सबकुछ पु.ल असणाऱ्या 'गुळाचा गुणपती' चित्रपटात एका भोळ्या, सरळ, साध्या मुलाचे भावविश्व त्यांनी जे साकारले आहे, त्यास तोड नाही. म्हणजे लेखन, सादरीकरणाबरोबर अभिनेत्याचीही जबाबदारी त्यांनी उत्तमपणे पार पाडली.

पु.लं.च्या संवादांनी, गाण्यांनी, अभिनयाने, दिग्दर्शनाने रसिकांना अमाप आनंद दिला. एक मात्र महत्त्वाचे पु.लं. चा शब्दनिष्ठ, कोटीनिष्ठ विनोद हा अभिजात होता. तो कुणालाही दुखावणारा, कुणाच्याही व्यंगावर बोट ठेवणारा नव्हता. शब्दाशब्दांवर ते लीलया, कोट्या सफाईदारपणे करत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'कोट्याधीश' हे पुस्तक होय. जे वाचकाला मनसोक्त हसवते.

कवी मनाच्या पु.लं.नी संगीताच्या दुनियेतसुद्धा तेवढीच आनंददायी कामगिरी केली. त्यांचे 'नाच रे मोरा' हे गाणे आजही ताजे, टवटवीत वाटते. त्याच्या चालीवर, लयीवर मलांचे पाय थिरक लागतात.

स्वानंदासाठी काव्यवाचन करता करता त्यांना जवळपास शेकडो कविता मुखोद्गत होत्या.

‘देणाऱ्याचे हात हजारो

दुबळी आमुची झोळी'

या उक्तीचा प्रत्यय पु.लं. बाबत येतो. साहित्य लेखनातून, अभिनयातून, नाटकातून पु.लं.नी जे पैसे कमावले आणि ज्या समाजाने त्यांच्या कलेचा आदर म्हणून त्यांना दिले, त्या समाजालाच पु.लं.नी ते साभार परत केले. त्यांच्या शोधकवृत्तीमुळे कोणी अडचणीत आहे वा आजरपणासाठी पैसे हवे आहेत, असे कळले की, पु.लं.चा मदतीचा हात तेथे पोहचत असे. रुग्णालये, मुक्तांगण शैक्षणिक संस्था, रक्तपेढ्या सर्वांना गरजेच्यावेळी त्यांनी भरभरून मदत केली.

अशा थोर दात्याचे निधन १२ जून २००० रोजी झाले. तेव्हा नभोवाणीसह मासिके, वृत्तपत्रे, साप्ताहिके, वर्तमानपत्रे सर्व प्रसारमाध्यमातून त्यांच्यावर आदरांजलीपर, संस्मरणपर लेखन केले गेले. या सर्वांनी 'पु.ल. एक आनंदयात्री' असाच गौरव केला. विविध कलांच्या क्षेत्रात वावरताना जो आनंद पु.लं. ना मिळाला, तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला.

Similar questions