India Languages, asked by vasudeomahajan1712, 5 months ago

माझा आवडता प्राणी
निबंध in Marathi​

Answers

Answered by smitchavan2304
0

सिंह हा दिसायला खूपच हिंसक आणि भयानक असतो. सिंहाच्या एका डरकाळी मध्ये संपूर्ण जंगल घाबरते. आणि हेच कारण आहे ज्यामुळे सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते.  सिंहाची बहादूरता आणि शूरवीरता पाहून सिंह हा माझा आवडता प्राणी बनला आहे. त्यामुळेच माझा आवडता प्राणी सिंह आहे. सिंहाला इंग्रजीमध्ये लॉयन असे म्हणतात तर सिंहाचे शास्त्रीय नाव  पॅन्थेरा लिओ असे आहे. सिंह हा क्रूर असल्याने तो इतर प्राण्यांची शिकार करून आपली उपजीविका भागवतो.म्हणून सिंह हा मांसाहारी प्राणी आहे. मुख्यता रात्रीच्या काळोख्या अंधाराच्या वेळेस सिंह शिकार करतात. मुख्यता सिंहिणी या सिन्हा पेक्षा जास्त शिकार करतात.सिंह है आपापले क्षेत्र निवडून घेतात. व आपल्या क्षेत्रात दुसऱ्या सिंहांना येऊ देत नाहीत व त्यांना शिकारही करू देत नाहीत.सिंहासारख्या क्रूर आणि  बलाढ्य प्राण्यांची लांबी ही सुमारे साडेतीन फूट असते तर उंची ही सुमारे दहा फूट एवढी असते. सिंहाचे वजन साधारणत 100 ते 200 किलो पर्यंत भरू शकते.सिंहाच्या जबड्यात एकूण 32 दात असतात. सिंहाचे दात खूप मजबूत आणि धारदार असतात. याच दातांच्या साहाय्याने सिंह शिकार करतात. सिंह 40 ते 80 किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याची ताकद ठेवतो. सिंहाची डरकाळी आठ किलोमीटर अंतरावर सुद्धा ऐकायला येते‌.सिंहाच्या मानेवर लांब लांब केस असतात त्या केसांना आयाळ असे म्हणतात. सिंहाचा जीवन कालावधी हा सुमारे वीस वर्षांचा असतो. परंतु आपण प्राणी संग्रहालयामध्ये पाहणारे सिंह हे सुमारे आठ ते दहा वर्ष जगतात.सिंह हा हिंसक प्राणी असल्याने सिंहाला पाळणे हे कायद्यानुसार बंदी  आहे. तसेच सिंहाची शिकार करणे हा सुद्धा गुन्हा आहे. जर कोणी सिंहाची शिकार केली असता त्याला दंड केव्हा तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते.सिंहाला एक दिवसांमध्ये 7 किलो मांस खाण्यासाठी आवशक्य आहे. सिंह चार ते पाच दिवस पाणी न पिता राहू शकतो. सिंहाची सिंहिणी दोन वर्षाच्या कालावधीनंतर पिलांना जन्म देते. सिंहिणी एका वेळेला दोन ते तीन पिलांना जन्म देते.सिंहाच्या पिल्लाला छावा असे म्हणतात. सिंह हे कळपाने राहतात सिंहा च्या एका कळपामध्ये 10 ते 15 सिंह असतात. सिंह मुख्यता सपाट गवताळ प्रदेश किंवा वीरळ जंगलाच्या प्रदेशात आढळतात.जंगलाचा राजा सिंह असला तरीसुद्धा आज सिंहाची संख्या कमी होण्याच्या मार्गावर आहेत. यामागील कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेली वृक्षतोड. आणि शिकार द्वारे होणारे सिंह बेकायदेशीरपणे शिकार.परंतु अलीकडे काढलेल्या सरकारच्या नियम व वन्य जीव संरक्षण योजनेमुळे आता भारतामध्ये सिंह यांची संख्या वाढत चालली आहे. 2010 साली झालेल्या सिंहाच्या गणनेनुसार भारतामध्ये एकूण 411 सिंह होते. तर 2015 मध्ये ही संख्या 523 एवढी झाली.सिंह आपल्या पर्यावरण साखळी मधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. असा हा शूर वीर आणि ताकदवान प्राणी सिंह मला खुप आवडतात म्हणून माझा आवडता प्राणी सिंह आहे.

Similar questions