माझा आवडता संत निबंध मराठी
Answers
Answer:
संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ - इ.स. १२९६ (समाधी)) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.
■■ माझे आवडते संत■■
संत म्हणजेच आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवणारे, आपल्याला चांगले उपदेश देणारे, आपल्यावर चांगले संस्कार घडवणारे महात्मे. आपल्या देशामध्ये खूप महान संतांंनी जन्म घेतले आहे. या संतांचे कार्य आपल्या देशासाठी, देशातील लोकांच्या भल्यासाठी खूप महत्वाचे ठरले आहे.
आपण प्रत्येकाने इतिहासाच्या पुस्तकातून, आपल्या आई वडिलांकडून, ग्रंथांमधून संतांच्या गोष्टी ऐकल्या आहेत.तसे तर मला सगळेच संत आवडतात. पण माझे सगळ्यात आवडते संत आहेत, संत तुकाराम.
संत तुकाराम स्वभावाने खूप चांगले होते.ते खूप प्रेमळ होते.त्यांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नव्हता.ते कोणाचा द्वेष करत नसत.
एकदा संत तुकाराम घरी येत होते.त्यांनी आपल्या मुलांसाठी ऊस घेतला होता.पण वाटेत त्यांना इतर मुले भेटली. त्यांनी ऊस मागितला.तुकाराम महाराजांनी त्यांना पूर्ण ऊस आनंदाने दिला.ते असे परोपकारी होते.
तुकाराम महाराज विठ्ठलाचे भजन करत असत.ते कीर्तन करायचे.त्यांनी खूप अभंग लिहिले.आपल्या कीर्तनातून व अभंगांतून ते लोकांना उपदेश करत असत.त्यांचे अभंग अजूनही आपल्याला स्फूर्ती देतात.