Hindi, asked by khazoya94, 3 months ago

माझा आवडता शिक्षक निबंध ​

Answers

Answered by ramachandrakuber4545
17

Answer:

हे उत्तर बरोबर आणि चांगलं आहे

Attachments:
Answered by rajraaz85
4

Answer:

आपल्यावर चांगले संस्कार करणारे आपला आयुष्य घडवणारे पहिले गुरू म्हणजे आपले आई-वडील त्यांचा आपल्या आयुष्यात अनमोल वाटा असतो.

अगदी त्याच प्रमाणे शिक्षक हे आपल्या आयुष्यातील दुसरे गुरु आपल्या आयुष्याला वळण देणारे खडतर वाटेवर योग्य रस्ता दाखवणारे म्हणजे आपले शिक्षक. केदार सर हे माझे आवडते शिक्षक आहेत. अत्यंत मनमिळाऊ, शिस्तप्रिय असा त्यांचा स्वभाव आहे. केदार सर आम्हाला इंग्रजी विषय शिकवतात. ते आमच्या वर्गाचे वर्गशिक्षक आहेत. त्यांचा तास आला की मला फार आनंद होतो. इंग्रजी विषयाची आधीपासूनच खूप भीती वाटायची. कारण इंग्रजी ही आपली बोलीभाषा नसल्यामुळे त्यामुळे अधिकच जास्त भीती वाटायची. पण सरांनी सोप्या पद्धतीने शिकवून मनातील भीती कायमची काढून टाकली.

सर नेहमी म्हणतात तुमचा स्वतःवरती विश्वास असू द्या. त्यावेळेस तुमच्या मनातील भीती ही नष्ट होईल. आणि तुम्ही धैर्याने प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार व्हाल. केदार सर शिक्षक म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून देखील खूप चांगले आहेत. नेहमी आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. सर्व विद्यार्थ्यांना खूप मदत करतात. ज्या मुलांना अभ्यासात अडचणी आहेत, अभ्यासात कमकुवत आहेत अशा मुलांना ते जास्तीचे तास घेऊन शिकवतात.

माझी देवाकडे प्रार्थना आहे असे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना मिळावे. मला केदार सरांचा खूप अभिमान वाटतो. मी सरांची आयुष्यभर ऋणी राहील. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर सरांचे ते प्रेमळ शब्द खूप आठवतील.

Similar questions