माझे आवडते व्यक्तिमत्त्व
Answers
Annasaheb Karve
प्रस्तावना ज्यांचे व्यक्तिमत्त्व आदर्श आहे अशी माणसे समाजाचे नेते असतात. आपापल्या क्षेत्रात तरी ते उत्तुंग यश मिळवतात. महाराष्ट्रात आदर्श व्यक्तिमत्त्वाची अनेक माणसे होऊन गेली. गोपाळ कृष्ण गोखले, न्या. रानडे, लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण, वालचंद हिराचंद, शंतनुराव किर्लोस्कर अशी अनेकांची व्यक्तिमत्त्वे आदर्श होती. त्यांनी स्वप्रयत्नाने आपले व्यक्तिमत्त्व आदर्श बनविले. म्हणूनच या सर्वांना समाजात उच्च स्थान मिळाले. या पुस्तकाचा वाचक म्हणेल की, ‘मी तर अगदी सामान्य आहे. माझ्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता नाही व माझा देह व चेहरासुद्धा आकर्षक नाही. मला चांगले संभाषण करता येत नाही, पण तुम्हाला खरे सांगतो की आदर्श व्यक्तिमत्त्वासाठी या गोष्टींची जरुरी नाही. भारतरत्न अण्णासाहेब कर्वे अतिशय कमी बोलत असत. पण त्यांची कार्यावरील निष्ठा अजोड होती. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व आदर्श ठरले आणि त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान लाभला. मग आदर्श व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी पाहिजे तरी काय? ते सांगण्यासाठीच या पुस्तकाचा प्रपंच केला आहे. आदर्श व्यक्तिमत्त्व बनवायला सुंदर चेहरा नको पण शरीराचे आरोग्य हवे. प्रत्येकाला ईश्वराने छोटासा तरी गुण दिलेला असतो तो तुम्ही ओळखायला हवा. तुमच्याकडे आत्मविश्वास हवा व वरील निर्णय घेण्याची क्षमता हवी. या सगळ्याला बुद्धिमत्ता किंवा नशीब लागत नाही.
Follow me