माझे आवडते व्यक्तिमत्व निबंध लिहा
Answers
Answer:
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जीवन म्हणजे विज्ञानाप्रती, देशाप्रती, समाजाप्रती वाहिलेले एक अग्निकुंड आहे. भारताला महासत्ता बनवण्याच्या स्वप्नाने भारलेल्या या महान व्यक्तीची माहिती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे म्हणून डॉ. कलामांच्या जीवनावर निबंध लिहणे हा उपक्रम विद्यार्थीदशेत असताना राबवतात.भारताचे अकरावे राष्ट्रपती, मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे संपूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म तामिळनाडूत रामेश्वरम् येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.
ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एरोनॉटिकल इंजिनिअर होते. ते विद्यार्थीदशेत असताना कुशाग्र बुद्धीचे धनी होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उच्च शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यांचे माध्यमिक शिक्षण रामनाथपुरम येथे झाले. त्यानंतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी घेतली. एरोस्पेस तंत्रज्ञानाबद्दल त्यांना प्रचंड आवड होती.
Answer:
प्रकाश बाबा आमटे
माझे आवडते व्यक्तिमत्व डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हे आहेत. डॉक्टर प्रकाश आमटे हे समाजसेवक आहेत. फक्त डॉक्टर प्रकाश आमटे हेच नाही तर त्यांची पत्नी डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे यासुद्धा समाजसेविका आहेत.
प्रकाश आमटे हे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या ठिकाणी आदिवासी लोकांसाठी कार्य करतात. त्यांनी आदिवासी जनसमुदायासाठी शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींसाठी स्वतःला वाहून नेले.
डॉक्टर प्रकाश आमटे हे फक्त आदिवासी जनसमुदाय यासाठीच नाही तर तिथे राहणाऱ्या प्राण्यांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण काम करतात. त्यांचे निस्वार्थ पणे लोकांची सेवा करण्याचे कार्य मला खूप प्रभावित करते.