Sociology, asked by kaifshaikh1136, 1 month ago

माझे बाबा निबंध लिहा! plz help me.​

Answers

Answered by ap9827485
2

Answer:

माझे बाबा

माझे बाबा म्हंटल कि बाबांन विषयी काय बोलावे हे कळतच नाही, पण आईच तस नाही. पण हे अस का, बाबा आपल्या साठी काही करत नाही का ? असा विचार मनात आला. आणि मी विचार करू लागला तो म्हणजे एकाच गोष्टीचा आणि तो होता माझे बाबा..!.

माझ्या बाबांचं नाव वसंत आहे. कोणी बाबांना वडील, पप्पा, बाबा अश्या नावा ने हाक मारतात पण मी माझ्या बाबांना पप्पा असा बोलतो. माझ्या बाबांन च बोलायचं झाल तर ते सगळ्या वडिलान प्रमाणे एकदम कडक आहेत, आणि गंमत म्हणजे तुमच्या सारख मी हि त्यांना खूप घाबरतो.

पण एक मिनिट बाबा म्हणजे सर्वांना वाटते कि एक कडक, शीस्थपद माणूस पण असे नाही. आई जीत्केच बाबा सुधा निर्मल व आपल्यांना न कळत खूप प्रेम आणि माया करतात. पण लहान पणा पासून आपल्यांना अशी सवय लागली असते कि आपल्यांना बाबांच नाव सांगितला कि घाबरी वाटते.

सगळ्यांना आई खूप आवडते कारण आपण सगळे आई कडे जे काही असेल प्रत्येक लहान गोष्टी पासून ते काही मोठ झाला कि लगेच आई ला जाऊन सांगतो, कोणती वस्तू हवी असेली तरी आपण न घाबरता त्या वस्तू साठी आई कडे हट्ट करू लागतो, पण बाबांच्या बाबती तसे नसते आपल्यांना बबनं कडे काही मागणं तर सोडा काही बोलायला पण भीती वाटते.

कारण लहान पाना पासूनच काही झाले कि आई आपल्यांना सागते हे करू नको ते करू नको, अभ्यास कर आणि नाही केला तर बाबांना नाव सांगेन आणि बाबा तुला ओरडतील. अशी बाबांची भीती आपल्या मदे लहानपणा पासूनच निर्माण केली जाते, आणि आपल्यांना वाटते कि बाबा काही झाले कि आपल्यांना ओरडतील, आणि त्याच भीती ने आपण त्यांना घाबरू लागतो. पण बाबा खर्च तसे असतात का ?.

नक्कीच नाही बाबा आपल्यांवर भरपूर प्रेम करतात, पण ते आपल्यांना दाखवत नाही. दिवाळी असली कि बाबा सगळ्यांन साठी हवे तसे कपडे घेऊन देतात ते कधी हि नाही सागणार नाही पण स्वता साठी मात्र काही घेणार  नाही ते बोलती माज्या कडे तर आहेत कपडे मला काय गरज पण असे नसते ते फक्त आपला विचार करत असतात. ते स्वता जुने कपडे वापरतात पण आपल्या मुलांना नवीन कपडे घेऊन देतात.

बाबा नेहमी आपल्या मुलांच्या भविष्या चा विचार करत असतात, ते आपल्यांना ओरडतात हे खर आहे पण ते असे करतात कारण आपण आपल्या आयुष्या मदे काही चागले करावे म्हणूनच त्यांना आपली खूप कळजी असते. आपल्यांना बर नसला तर बाबांना रात्रभर झोप लागत नाही ते आपली चिंता करत बसतात.

कधी पण आपल्यांना थाडस लागला किव्हा काही झाल तर आपल्या तोंडात एकच शब्द येतो तो म्हणजे आईग. पण जेव्हा काही मोठ होते तेव्हा येणार शब्द असतो बापरे. हि एक गमतच आहेना. बाबा आपल्यासाठी जीवन भर खूप कष्ट करतात कारण त्यांना आपल्यांना मोठ करयच असते. ते आपल्या साठी स्वताच्या जीवनाचा रान करतात, आपल्यांना हवी असलेली प्रत्येक वस्तू ते आपल्यांना आणून देतात अशे आपले बाबा असतात. मला माझ्या बाबांन वर खूप प्रेम आहे आणि मला माझे बाबा खूप खूप आवडतात.

Answered by Omarnav
2

Explanation:

आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला?' असा प्रश्न गाण्यातल्या मुलांना पडला असला तरी मला मात्र आई इतकेच बाबाही आवडतात. दोघांचेही माझ्यावर खूप प्रेम आहे.

माझे बाबा दिसायला किंचित उग्र व कडक शिस्तीचे वाटतात. पण ते मनाने फारच प्रेमळ आहेत. आम्हा मुलांवर तर त्यांचा फार जीव. माझ्या अभ्यासातील प्रगतीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. माझे सामान्यज्ञान वाढावे म्हणून ते निरनिराळी सचित्र पुस्तके आणून माझ्याकडून वाचून घेतात. ते नवीन माहितीही छान समजावून सांगतात.

अभ्यासाबरोबरच मी भरपूर खेळावे असे त्यांना वाटते. म्हणून ते मला स्वतः मैदानावर घेऊन जातात. तेथे इतर मुलांबरोबर पकडापकडी, चोर-पोलीस, बॅट-बॉल वगैरे खेळताना मला खूप मजा वाटते.

सुट्टीच्या दिवशी दुपारी कॅरम, पत्त्यांचे डाव वगैरे खेळ बाबा माझ्याबरोबर खेळतात. कधी कधी आई व ताईही या खेळात सामील होतात. मग आम्हा चौघांचा खेळ खूपच रंगतो. माझे बाबा सध्या मला सायकल चालवायला शिकवीत आहेत.

माझे बाबा खूप सपजूतदार असून अकारण रागावलेले किंवा चिडलेले मी तरी त्यांना पाहिले नाही. त्यामुळे आमचे घर नेहमी आनंदी व उत्साही असते. माझ्या बाबांसारखे बाबा सर्वांनाच मिळावेत असे मला नेहमी वाटते.

Similar questions