World Languages, asked by royaldeep69, 4 months ago

माझे कुटुंब essay in marathi ​

Answers

Answered by yashikadutta123
6

Answer:

माझे कुटुंब इतर भारतीय कुटुंबांसारखे एक छोटेसे कुटुंब आहे ज्यात मी, माझे बाबा, माझी आई, माझी छोटी बहीण आहे. माझी आई सगळ्यांची काळजी घेते. आई मला आणि माझ्या बहिणीला दररोज सकाळी वेळेवर तयार करते. बाबा दररोज आमच्या कुटुंबासाठी उशिरा पर्यंत काम करतात. बाबा मला आणि छोट्या बहिणीला खूप लाड करतात. आम्हाला फिरायला नेतात, नवीन कपडे घेतात. माझी बहीण आणि मी एकत्र शाळेला जातो आणि दररोज एकत्रच खेळतो.आमच्या दोघांची टीव्हीच्या रिमोटवरून खूप भांडणे होतात. पण माझ्यावर आई ओरडल्या नंतर आईच्या ओरड्यापासून पासून ती मला वाचवते आणि मी तिला वाचवतो. आम्ही कोणीही आजारी पडलो तर आई रात्रभर जागी राहते आणि आमची काळजी घेते. घर सांभाळण्यासाठी बिना कंटाळा करता किंवा कोणतेही तक्रार न करता रात्र आणि दिवस कष्ट करते. हे सर्व करूनहि ती आमचा अभ्यास घेते. आई आणि बाबा दोघेही आमच्यासाठी खूप काही करतात. माझे माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.

Answered by mudhirajharika25
2

Answer:

कुटुंब हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. आपल्या कुटुंबामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. म्हणूनच ह्या लेखामध्ये आम्ही माझे कुटुंब या विषयावर मराठी मधून माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर मराठी निबंध, भाषण लिहण्यास मदत करेल. माझे कुटुंब या विषयावर इयत्ता १,२,३,४,५ यांना १०, १५ ओली लिहण्यास सांगितले जाते, तसेच आउअत्तना ६,७,८,९,१० मधील विद्यार्थ्यांना निबंध, भाषण लिहण्यास सांगितले जाते. चला तर मग सुरु करूया.

माझे कुटुंब, माझी जबाबदारीविषयावर मराठी निबंध भाषण

कुटुंब हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय विचार येतो? प्रेमळ आई, लाड करणारे बाबा, हट्टी पण लाडकी बहीण, गोष्ट सांगणारी आजी, आपल्या सोबत खेळणारे आजोबा असे एक  सुखद चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. कुटुंब म्हणजे एका घरात एकत्रित राहणारे,एकमेकांच्या नात्यातले ज्यांच्यात परस्पर संबंध आहे, जसे आई, वडील, बहीण, भाऊ इत्यादी. जे साधारणपणे  एकत्रित राहतात, एकमेकांची काळजी घेतात त्याला कुटुंब म्हणतात.  आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंब बघायला मिळतात जसे विभक्त कुटुंब, संयुक्त कुटुंब, विस्तारित कुटुंब इत्यादी. ह्या लेखामध्ये आम्ही माझे कुटुंब माझा परिवार या विश्वावर निबंध स्वरूपात माहिती दिली आहे. हि माहिती तुमच्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये मदत करेल. चला तर मग सुरु करूय

Explanation:

Similar questions