माझा मित्र essay in marathi any help
Answers
■■ माझा मित्र■■
तसे तर माझे बरेच मित्र आहेत.पण, माझा सगळ्यात खास मित्र सोहम आहे.सोहम माझा खूप जुना मित्र आहे.त्याला मी गेल्या पंधरा वर्षांपासून ओळखतो. माझी त्याच्याशी भेट शाळेत झाली होती. तेव्हापासून आम्ही खूप चांगले मित्र आहोत.
सोहम आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकतो. आम्ही एकत्र कॉलेजमध्ये जातो.तिथे खूप मजा करतो, तसेच अभ्याससुद्धा करतो.सोहम अभ्यासात खूप हुशार आहे.तो मला अभ्यासात मदत करतो.
आम्ही सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जातो.अडचणींमध्ये एकमेकांना मदत करतो.तो मला नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन देतो.
कधीकधी आमच्यामध्ये भांडणं सुद्धा होतात. पण, आम्ही लगेच एकमेकांशी बोलू लागतो. आम्ही एकमेकांशी बोलल्याशिवाय जास्त दिवस राहू शकत नाही.
आमच्यामधील मैत्री पाहून, सगळे आम्हाला भाऊ-भाऊ म्हणतात. मी खूप आनंदी आहे की मला सोहम सारखा मित्र मिळाला.
Answer:
समीर हा माझा एक जिवलग मित्र आहे. तो नेहमी खेळांच्याच गप्पा मारत असतो. तो खरा खेळगडी आहे. समीरला कुठल्याही एका विशिष्ट खेळाची आवड आहे, असे नाही आहे. नाहीतर सदासर्वकाळ क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या मैदानाची लांबीरुंदी माहीत असते बरे? ई! सर्वच खेळांत तो रस घेतो. विशेष म्हणजे प्रत्येक खेळाविषयी त्याला तंत्रशुद्ध माहिती समीर खेळांविषयीची केवळ माहिती गोळा करत नाही, तर तो सर्व खेळ उत्तम खेळतो. सहज एखादा निरोप सांगायला म्हणून तो घरी येतो, आणि कॅरमचा एक डाव जिंकून जातो. तितक्याच सफाईने तो शाळेच्या क्रिकेट संघात आपली कामगिरी बजावतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावर आट्यापाट्या खेळणाऱ्या कामगारांतही त्याला भाव आहे. 'समीरदादा' आले की आपला संघ जिंकणार, अशी त्यांना खात्री असते.
कोणत्याही खेळाच्या जागतिक स्पर्धा सुरू झाल्या की, त्याची सर्व माहिती, अगदी आकडेवारीसह समीरला तोंडपाठ ! किती राष्ट्रे या स्पर्धेत उतरली आहेत? सामने कोठे कोठे आहेत? प्रत्येक संघातील उत्तम खेळाडू कोण? त्या खेळाडूंच्या खेळाचे वैशिष्ट्य काय? यांबाबतची सगळी माहिती समीर देत असतो. त्याने बांधलेले अंतिम निकालाबद्दलचे आडाखे सहसा चुकत नाहीत; कारण याबाबतचा समीरचा अभ्यास चोख आहे. खेळांविषयीच्या पुस्तकांचा मोठा संग्रह त्याच्याजवळ आहे. प्रत्येक वृत्तपत्रात येणाऱ्या क्रीडाविषयक बातम्या तो बारकाईने वाचतो. आवश्यक ती कात्रणे काढून ठेवतो. त्याने जमवलेला खेळाडूंचा आल्बम तर पाहण्यासारखा आहे. कुठेही कोणी खेळाडू येणार आहे, असे कळले की समीर धावलाच तेथे त्याला भेटायला.
समीरच्या या छंदाला त्याचे आईवडील केव्हाही विरोध करत नाहीत. उलट दोघेही त्याचे कौतुक करतात. त्याचे बाबा क्रीडाविषयक मासिके त्याला आणून देतात. कारण समीर छंद सांभाळून आपला अभ्यासही उत्तम ठेवतो. त्यामुळे माझा हा दोस्त घरात, शाळेत आणि सर्व मित्रांत विशेष आवडता आहे.