India Languages, asked by mukeshsinghrawat875, 9 months ago

माझा महाराष्ट्र निबंध​

Answers

Answered by shivanikaran
9

दिनांक १ मे २०१० रोजी महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. एक वेगळीच भावना मनात जन्माला आलीय. गेली कित्येक वर्षे जगण्याच्या , विकासाच्या धडपडीत स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आपला महाराष्ट्र. दगडांचा, मातीचा, वीरांचा, कलावंतांचा, बुद्धीवंताचा, शास्त्रज्ञांचा....समाजसुधारकांचा आणि ..... राजकारण्यांचा ...... महाराष्ट्र माझा !

गेल्या ५० वर्षात महाराष्ट्राने खुप प्रगती केलेली आहे. मुंबई आजही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जगातील बहुतांशी नामवंत कंपन्या महाराष्ट्रात आपली ऑफीसे थाटून आहेत. शेती, संस्कृती, खाद्यपदार्थ, निसर्ग, इतिहास सगळेच विलक्षण आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मनाला खुप आनंद होतो आणि गर्व वाटायला लागतो मराठी मातीत जन्माला आल्याचा, महाराष्ट्रीय असल्याचा. पण खरेच महाराष्ट्र विकसीत झालाय का? विकासाच्या नक्की व्याख्या तरी काय असतात? गेल्या ५० वर्षात हळू हळू आपले राज्य कुठल्या दिशेने जात आहे हेही लक्षात घ्यायला हवेच. ५० वर्षे उलटून गेली तरी अजुनही मुलभूत प्रश्न तसेच आहेत. विज भारनियमन आहेच, सगळीकडे असणारा भ्रष्टाचाराचा राक्षस इथेही आहेच. सत्तेसाठी चालणार्‍या अमानुष राजकारणापायी सामान्यजनांची होणारी फरफट आजही आहेच. कृषीराजाची काय अवस्था झालेली आहे हे सांगायलाच नको, रोज वर्तमानपत्रात कुठल्या ना कुठल्या शेतकर्‍याच्या आत्महत्येची बातमी असतेच. पण आमचे राजकारणी मात्र आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे यावरच समाधान मानताना दिसतात. मुळ समस्येवर घाव घालायचा प्रयत्नच केला जात नाही. याचसाठी केला होता का अट्टाहास? याचसाठी का छेडले होते "संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे रणश्रूंग? याचसाठी दिले होते १०६ हुतात्म्यांनी आपले बलिदान? छत्रपती शिवाजीराजांनी ध्यास घेतलेले, अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताने शिंपलेले हिंदवी स्वराज्य हेच होते का?

खरेतर हे आपले दुर्दैव आहे की विदेशी सैन्याविरुद्ध लढून आपण भारतमातेला स्वतंत्र केले, स्वातंत्र्ययुद्धात मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता, तरीही महाराष्ट्र मिळवण्यासाठी मराठी माणसाला बलिदान द्यावे लागले. कधी मोरारजी देसाई कधी कॉंग्रेसच्या विरोधात तर कधी आपणच संसदेत पाठवलेल्या कृतीशुन्य प्रतिनिधींबरोबर. ज्याप्रमाणे जनरल डायर ने जालियनवाला हत्याकांड घडवून आणले त्याच प्रमाणे मोरारजी देसाईने निशस्त्र आणि सामान्य मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या यात १०६ हुतात्मे झाले. काय होती नेमकी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ...?

hope it will help you kindly mark the answer as brainlist.

Similar questions