India Languages, asked by crronaldo19771, 1 year ago

माझे ध्येय यावर मराठी निबंध

Answers

Answered by gadakhsanket
181
नमस्ते मित्रांनो,

★ माझे ध्येय -

आयुष्यात यशस्वी बनावे हे प्रत्येकालाच वाटते, परंतु खूप कमी लोक त्यासाठी अथक प्रयत्न करतात. सर्वप्रथम आपण एक चांगला माणूस म्हणून स्वीकारले गेलो पाहिजे. मग त्याबरोबरच एखादी व्यायसायिक आकांक्षा असावी. माझंही असेच एक ध्येय आहे जीवनात - 'डॉक्टर व्हायचे'.

लहानपनापासून आपण बघतो की डॉक्टर जनतेच्या आरोग्याची कीती काळजी घेतात. लोकांचे जीव वाचवतात. मलाही या समाजसेवेत स्वतःचा हातभार लावायची इच्छा आहे. डॉक्टरांना मिळणारा सन्मान मलापण कधीतरी हवाय.

माझ्या या ध्येयासाठी मी प्रयत्नही सुरू केलेत. अभ्यासाची पराकाष्ठा करत मी MH-CET ला १८०/२०० गुण मिळवले. आता वैद्यकीय महाविद्यालयात ऍडमिशन मिळवून खूप चांगला डॉक्टर बनणार आहे.

या माझ्या ध्येयपूर्तीसाठी मी होईल ते सर्व करण्याचा मी निर्धार केला आहे .

धन्यवाद...
Similar questions