माझी उन्हाळ्याची सुट्टी – मराठी निबंध, भाषण, कविता, चारोळी
Answers
Answer: मला उन्हाळ्याची सुटी खूप खूप आवडते कारण तेव्हा मला मामाच्या गावी जायला मिळते. उन्हाळ्याच्या सुटीची मी आतुरतेने वाट पाहत असते.
सुटी लागली की आजोबा आम्हाला न्यायला येतात. गावी जातानाचा प्रवास फार मजेशीर असतो. मागे पळणारी झाडे, डोंगर, नद्या पाहण्यात वेगळीच मजा असते.
गावी गेल्यावर आजी आणि आजोबा रोज रानात घेऊन जातात. त्यामुळे वेगवेगळी पिके, पक्षी पाहायला मिळतात. आजी तर छान जेवण बनवून खायला घालते. मामा रोज फिरायला घेऊन जातो आणि खाऊ देतो.
उन्हाळ्यात गावी जत्रा असते. तेव्हा तर फारच धमाल येते. सर्व नातेवाईक एकत्र येतात. खाऊची नुसती चंगळ असते. अशी ही आनंदाची उन्हाळ्याची सुटी मला फार आवडते.
Explanation:
Answer:
मला उन्हाळ्याची सुट्टी खूप आवडते उन्हाळ्याच्या सुट्टीत मला मामांकडे सगळ्यांकडे जायला भेटत. उन्हाळ्याच्या सुट्टीत परीक्षेचा ताण नसते. फक्त आपल्याला जायचं असतं आपल्या मित्रांसोबत भावंडांसोबत खूप खूप खेळायचं असतं खूप मज्जा येते आजी आपल्या सुट्टी छान छान गोष्टी सांगते. सुट्टीत आवडता म्हणजे आंबा खायला भेटतो आईस क्रीम मिळते कुल्फी असं सगळं काही उन्हाळ्याच्या सुट्टीत खायला भेटतं. सुट्टीत बाहेर फिरायला सुद्धा आई-बाबा आपल्याला घेऊन जातात छान छान कपडे सुद्धा घेतात उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण तान तनाव मुक्त असतो. आपल्याला खूप खूप गोष्टी आणि कविता करता येतात अंगणभर पडणारे वाळवण कैरीची डाळ आणि पुन्हा कधी मध्ये घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचा गोळा आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना रेल्वे मध्ये बघायची खूप मज्जा येते. त्या रेल्वेतून जाताना ती झाडं हवा पान त्याची सुद्धा मज्जा येते खिडकीत बसायची सुद्धा मज्जा येते .आता असं वाटतंय की कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताय