India Languages, asked by cmayuri626, 7 months ago

'माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान' या विषयावर तुमचे विचार लिहा​

Answers

Answered by Anonymous
49

आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हे आपले गुरुच आहेत. त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ‘शिक्षकदिन’ साजरा करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थसमजून घेऊया. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात.

आपल्यावर निरनिराळे संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई-वडील हे आपले पहिले गुरु. बालपणात आई-वडील आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतात. योग्य काय आणि अयोग्य काय, याची जाणीव करून देतात. तसेच चांगल्या सवयी लावतात.

आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक, हेच आपले दुसरे गुरु. शिक्षक आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात. ते इतिहास शिकवतात. त्यातून ते आपल्यातील राष्ट्राभिमान जागृत करतात. आपण आपल्यासाठी जगायचे नसते, तर राष्ट्रासाठी जगायचे असते, हा व्यापक विचार आपल्याला देतात. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव इत्यादी क्रांतीकारकांनी राष्ट्रासाठी प्राणार्पण केले, त्याप्रमाणे आपण त्याग करायला हवा. ‘त्याग हा आपल्या जीवनाचा पाया आहे’, हे आपल्याला शिक्षक सांगतात. त्यागी मुलेच राष्ट्राचे रक्षण करू शकतात. इतिहासातून आपले आदर्श ठरतात, उदा. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर हेच आपले खरे आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे आपण त्यागी असायला हवे.

Similar questions