Hindi, asked by sindrela, 10 months ago

मी केलेले श्रमदान , मराठी निबंध

Answers

Answered by Hansika4871
77

अन्नदान, रक्तदान ह्यांच्या बरोबरीने श्रमदान देखील खूप महत्त्वाचे आहे. श्रमदान हे एकट्याने किंवा संघटित पणे करता येतं. जे काम एकट्याला शक्य नसतं ते संघटित पणे करून, श्रम करून साध्य करता येतं. एकत्रित पणे श्रम केल्याने परिश्रम कमी लागतात, वेळ कमी लागतो आणि गोष्ट लवकर साध्य होते.

पावसाअभावी शेतकऱ्यांचे हाल होत असताना एकत्रित पणे जमिनीत मारलेले खड्डे म्हणजेच शेततळी कालांतराने पाण्यानी भरून नंतर ती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरलेली आहेत.

ह्याचा अर्थ असा होतो की श्रमदानतून फायदा घेता येतो पण त्यासाठी एकत्र येणे गरजेचे असते

Answered by anitahande0905
34

जीवनात श्रमाचे महत्त्व

ज्या युगात फक्त बटन दाबले की, चुटकीसरशी अनेक कामे होतात, अशा संगणक युगात आज आपण सर्वजण वावरत आहोत. त्यामुळे काम करून घाम गाळणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. काम करणे हे कमीपणाचे मानले जात असून शारीरिक कष्ट करणाऱ्या श्रमिकांना यंत्र युगाच्या काळात निकृष्ट मानल्या जात आहे आणि बसल्या ठिकाणी बौद्धिक कष्ट करणाऱ्याना श्रेष्ठत्व दिल्या जात आहे. परंतु असे करणे म्हणजे एक प्रकारे श्रमाचा व त्या श्रमिकांचा अपमान नव्हे काय ? बौद्धिक कष्टाइतकेच शारीरिक कष्ट सुध्दा महत्वाचे आहे. काबाडकष्ट केल्यामुळेच मानवाची प्रगती होते. आयत्या वाढलेल्या कुरणात चरणे एखाद्या पशुला शोभते माणसाला नक्कीच नाही. त्यास्तव कष्ट वा श्रम मग ते कोणतेही असो ते मनापासून करावे. वरवर केलेल्या कामात आनंद तर मिळत नाहीच तसेच त्याचे फळ ही मिळत नाही. मनातून केलेल्या कामाची कुणालाही बोझा वाटत नाही. मात्र तेच काम अनिवार्य किंवा बंधनात टाकले की कधी एकदा संपते असे वाटते. उदा. शाळेतील मुलांना त्यांच्या आवडीनुसार अभ्यासाचे किंवा इतर काम लावल्यास ते त्यात तल्लीन होऊन काम करतात. याउलट हे काम केलेच पाहिजे असा हेका धरल्यास किंवा बंधन टाकल्यास तो अभ्यास किंवा इतर काम त्याला कंटाळवाणे व नीरस वाटते

एखादे काम सुरु करण्यापूर्वी त्याचे ध्येय ठरविणे सुद्धा गरजेचे आहे. ध्येयाविना काम करणे म्हणजे ढोरासारखे काम करण्यासारखे आहे. त्यामुळे उचित ध्येय प्राप्तीसाठी नियोजनपूर्वक केलेले कामच यशस्वी होऊ शकते. त्यासाठी सर्वप्रथम कामाचे नियोजन करणे महत्वाचे ठरते. शालेय जीवनातील विद्यार्थ्याना या नियोजनाची ओळख झाली तर त्यांचे प्रत्येक काम यशस्वी होताना दिसून येते. बहुतांश विद्यार्थी दहावी वा बारावीच्या परीक्षा तोंडावर आली किंवा त्या वर्षी भरपूर मेहनत घेतात, अभ्यास करतात, सराव सुध्दा भरपूर करतात. मग अशा विद्यार्थ्याना घवघवीत यश मिळेल असे सांगता येईल काय ? कारण तहान लागली म्हणून विहीर खणण्यापेक्षा आपणास कधी तरी तहान लागणार आहे म्हणून जो आधीच विहीर खणुन ठेवतो त्याची खऱ्या अर्थाने तहान भागते. त्यास्तव फक्त महत्वाच्या वर्षी अभ्यास करून चालणार नाही. त्यासाठी प्रारंभी पासून अभ्यासाचे नियोजन केल्यास कमी श्रमात नक्कीच यश मिळू शकते. मनात नुसते संकल्प वा स्वप्नाचे महल बघितल्यास आपले कोणतेच मनोरथ पूर्ण होणार नाही. दे रे पलंगावरी भावनेतून आपण विचार करत असू तर ते आपल्या जीवनासाठी नक्कीच घातक आहे. त्यासाठी नेहमी प्रयत्न करत रहाणे अत्यंत गरजेचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्न केल्यास वाळूतून देखील तेल गळू शकते. त्यासाठी सर्वप्रथम स्वतः ची कामे स्वतः करायला शिकणे महत्वाचे आहे.

Similar questions