Hindi, asked by prachisingh5098, 2 months ago

माळढोक पक्ष्यामधील वैसेशिष्टये(any two)in marathi​

Answers

Answered by themakerqueries
0

Answer:

माळढोक (शास्त्रीय नाव: Ardeotis nigriceps) हा भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या सरंक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. याला इंग्रजीत 'ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात. विदर्भात या पक्ष्याला ’हुम’ म्हणतात.

मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारतातील कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या ह्या पक्ष्यांची संख्या इसवी सन २०११मध्ये केवळ २५० इतकी असल्याचा अंदाज करण्यात आला होता. २०१८मधे ही संख्या १५०वर आली आहे. शिकार आणि अधिवासाचा ऱ्हास यामुळे ही प्रजाती अतिशय संकटग्रस्त स्थितीत आहे. हा पक्षी सन १९७२च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमअन्वये संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

याचे मुख्य खाद्य छोटे व मोठे किडे, टोळ, बिया, छोटी झुडुपे, इत्यादी आहे.

Similar questions