Geography, asked by Azhark, 1 year ago

मी माझा आवडता खेळ निबंध in marathi

Answers

Answered by Sauron
80
hi mitra this is the answer for ur question
✌️✌️✌️✌️✌️✌️⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

लहानपणी माझा सर्वांत आवडता खेळ कोणता असेल? तर तो ‘क्रिकेट’. पाचवी पासून सातवी पर्यंत मला जेंव्हा कधी शाळेपासून सवड मिळायची, तेंव्हा मी गल्लीतल्या माझ्या सवंगड्यांसोबत ‘क्रिकेट’ खेळायचो. आम्ही मुले इतर खेळही खेळायचो, पण ‘क्रिकेट’ हा आमचा सर्वांत प्रिय असा खेळ होता. भारताचा एखादा अटीतटीचा सामना टि.व्ही. वर पहात असताना मी भावुकही व्हायचो! एकदा भारत अशाच एका अटीतटीच्या सामन्यात जिंकता जिंकता हरला, तेंव्हा मला माझे अश्रू अनावर झाले, इतकं माझं क्रिकेटवर प्रेम होतं.

कालोघात ते सवंगडीही मागे पडले व तो खेळही मागे पडला. गेल्या दहा वर्षांत मी क्वचितच क्रिकेट खेळलो असेन. का कोणास ठाऊक? पण क्रिकेट या खेळातील माझी रुची ही हळूहळू फारच कमी होत गेली. जसं मी क्रिकेट खेळणं सोडलं, तसं माझं क्रिकेट पाहणं देखील बंद झालं. आता तर मला ‘भारताचा सामना कधी आहे?’ हे देखील माहित नसतं, तेंव्हा भारताचे सामने टि.व्ही. वर पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! वर्तमानपत्रात येणार्या बातम्या वाचल्यानंतरच मला त्याबाबत माहिती होते. सतत होणार्या ‘मॅच फिक्सिंग’ मुळे क्रिकेट हा खेळ पाहण्यात काही ‘अर्थ’ उरला आहे, असे वाटत नाही.

आय.पी.एल. ची लोकप्रियता ही तर माझ्यासाठी अगदी अनाकलनीय आहे! पुण्याच्या टिममध्ये पुण्याचे खेळाडू असत नाहीत, मुंबईच्या टिममध्ये मुंबईचे खेळाडू असत नाहीत, केवळ पैसा आणि प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेवून आय.पी.एल. च्या व्यवसायात उतरलेले उद्योजग ‘पुणे वॉरिअर्स’, ‘मुंबई इंडियन्स’ म्हणून लोकांना भावनिक आवाहन करतात आणि लोक भुलतात! पुण्याचे, मुंबईचे खेळाडू बाजूला राहूदेत.. कमीतकमी मराठी खेळाडू तरी महाराष्ट्रातील शहारांच्या नावाने असलेल्या टिममध्ये असावेत की नाही!? आता काही लोक मला त्या टिममधील मराठी खेळाडूंची नावे सांगू लागतील.. पण मी इथे अपवादांबद्दल बोलत नसून संपूर्ण टिमबाबत बोलत आहे.

लोकांनी स्वतःहून क्रिकेट खेळावे त्यातून चांगला शारिरीक व्यायाम होतो, पण सतत टि.व्ही. वर दुसर्यांचा खेळ पाहून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे? मनोरंजनच हवे असेल, तर क्रिकेटहून अधिक चांगली अशी मनोरंजनाची कितीतरी साधने आहेत. शेवटी आवडी-निवडी या अगदी व्यक्तिगत असतात. पण आपल्या आवडी-निवडींमधून आपल्या जीवनात काही चांगला बदल होत आहे का? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जर असा बदल होत असेल, तर आपण योग्य मार्गावर आहोत असे समजायला हरकत नाही. नाहीतर आपल्या आवडी-निवडी बदलायची वेळ आली आहे, असे निश्चित समजावे!

hope it helps plz mark me as brainliest

Answered by ItsShree44
2

Answer:

आज एकविसाव्या शतकात माणसाला खेळाचे महत्त्व उमगलेले आहे. शरीर निरोगी राहण्याकरिता व्यायाम, योग वा खेळ आवश्यक आहेत हे सर्वमान्य झाले आहे. आज भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ ठरला आहे. त्यामुळे साहजिकच क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा क्रिकेट पाहणारे व ऐकणारे यांचीच संख्या फार मोठी झाली आहे. मी त्यांपैकीच एक. मी दूरचित्रवाणीवर क्रिकेटचे सामने पाहतो. असे सामने पाहताना सर्व क्रिकेटप्रेमी देहभान हरपून क्रिकेट खेळतो, क्रिकेटसंबंधित पुस्तके वाचतो आणि मैदानावर जाऊन वा न जमल्यास जातात.) क्रिकेटवर अलीकडे खूप टीका होत आहे. ती रास्तच आहे. हा खेळ चार-चार, पाच-पाच दिवस चालतो. क्रिकेटचे सामने असले की लोकांमध्ये अक्षरश: वारे संचारते. लोक कामधाम सोडून हा खेळ पाहत बसतात. त्यामुळे देशभर कामाचे लक्षावधी तास फुकट जातात.

कामावर हजर असलेले लोक एकाग्र चित्ताने कामे करत नाहीत. विदयार्थ्यांचे तर अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते. देशाच्या कार्यशक्तीची ही फार मोठी हानी आहे, यात शंकाच नाही. आपले क्रिकेटपटू खेळापेक्षा पैशाकडे लक्ष देतात. आपण देशाच्या वतीने खेळत आहोत, ही भावनाच लुप्त होत आहे. अलीकडे तर आपल्या खेळाडूंचा कोटी कोटी रुपयांना लिलाव होऊ लागला आहे. वारेमाप प्रसिद्धी व वारेमाप पैसा यांमुळे या खेळांच्या सामन्यात विकृत प्रवृत्ती शिरल्या आहेत. या खेळाकडे कोणीही खेळ म्हणून पाहतच नाही.

खिलाडूवृत्ती नष्ट होत आहे. इतर खेळांना काडीचीही किंमत कोणी देताना दिसत नाही. असे असले तरी हा खेळ मला खूप आवडतो. या खेळाचे काही फायदेही आहेत. या खेळामुळे चपळता, काटकपणा व शिस्तप्रियता या गुणांचा विकास होतो. या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार-षटकार मारणाऱ्या, अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे. अलीकडे क्रिकेटचे स्वरूप बदलत आहे. सध्या कसोटी सामन्यांबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. वीस-वीस षटकांचे सामनेही लोकप्रिय झाले आहेत; कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडुलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांची नोंद ठेवली जात असली तरी या खेळात सांघिक एकता हीच महत्त्वाची आहे. तीच यश खेचून आणते. काही वेळेला एखादया खेळाडूने भरपूर धावा केल्या तरी संघाला यश मिळत नाही. 'क्रिकेट हा योगायोगाचा (Chance) खेळ आहे'. प्रत्येक डावात काय घडेल, हे सांगणे कठीण असते. प्रत्येक खेळाडूला अतिशय जबाबदारीने खेळावे लागते; कारण त्यावरच त्याच्या संघाचा आणि पर्यायाने देशाचा लौकिक अवलंबून असतो.

Similar questions