माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर.....
Answers
Answered by
28
Answer:
माणूस जर हसण्याची शक्ती गमावून बसला तर,हा विचारच फार विचित्र आहे.आपण दिवसांतून बऱ्याच कारणांवर आणि बऱ्याच वेळा हसतो,कधी कोणाबरोबर हसतो तर कधी कोणावर हसतो.हसल्यामुळे आपले मन हलके होते.त्याने आपल्याला आनंद वाटतो.
हसण्याचे खूप फायदे आहेत.हसल्यामुळे माणूस त्याचे दुःख विसरतो. त्यामुळे आपले आरोग्य सुधारते, तणाव दूर होतो,आपण सकारात्मक विचार करतो आणि आपली मनःस्थिती बदलते.हसणे आपल्या हृदयासाठी चांगले असते,त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांद्वारे होणारा रक्त परिसंचरण सुधारतो.हसण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे भीती व वेदना कमी होते.
तुम्ही लोकप्रिय म्हण ऐकली असेलच की 'हास्य हा एक उत्तम औषध आहे'.माणूस जर हसण्याची शक्ती गमावून बसला तर, सगळीकडे नैराश्य पसरेल.म्हणून असा विचार आपण कधी करायला नको.
Explanation:
Similar questions