Science, asked by sakshigiri7676, 5 months ago

मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक नामनिर्देशित आकृती काढून त्यावर आधारित प्रश्नांची
उत्तरे लिहा:
(a)
डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते ?​

Answers

Answered by drishtisingh156
11

भिंग : एक किंवा दोन वक्रपृष्ठांमध्ये अंतरित केलेल्या पारदर्शक माध्यमाच्या खंडाला भिंग असे म्हणतात. चष्मे, दूरदर्शक (दुर्बिणी), सूक्ष्मदर्शक, कॅमेरे इ. विविध प्रकारच्या प्रकाशीय उपकरणांमध्ये भिंगाचा उपयोग केला जातो. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

इतिहास : काचेचा पोकळ गोल पारदर्शक द्रवाने भरल्यास त्यातून वस्तू (त्यांच्या प्रतिमा) मोठ्या झालेल्या दिसतात, ही गोष्ट प्राचीन ग्रीक व रोमन शास्त्रज्ञांना माहीत होती. इ. स. १५० मध्ये टॉलेमी (क्लॉडियस टॉलेमस) या प्रख्यात ग्रीक शास्त्रज्ञांनी आपल्या Optics या ग्रंथात अशा गोलांच्या काही गुणधर्मांचे वर्णन केले आहे. अकराव्या शतकातील अल्‍हॅझेन (इब्‍न अल हैथम) या अरब शास्त्रज्ञांनी आपल्या ग्रंथात या स्वरूपाच्या भिंगाबद्दल चर्चा केली आहे.

चष्म्यांच्या बहिर्गोल भिंगाबद्दल निःसंदिग्ध उल्लेख माईसनर यांनी तेराव्या शतकात केलेला आहे, तर अंतर्गोल भिंगाचा निर्देश नीकोलाऊस फोन कूझा यांनी पंधराव्या शतकाच्या मध्याला केला आहे. यानंतर भिंगाच्या साहाय्याने दूरदर्शक, सूक्ष्मदर्शक इ. उपकरणे तयार करता येतात हे शोध लागले. भिंगांबद्दल सैद्धांतिक व प्रायोगिक अभ्यास प्येअर द फेर्मा, सी. एफ्. गौस, जे. एल्. लाग्रांझ, आय्‍झॅक न्यूटन, एच्. एल्. एफ्. फोन हेल्महोल्ट्‍झ, अर्न्स्ट ॲबे इ. शास्त्रज्ञांनी केला.

follow me

Similar questions