Art, asked by like19, 2 months ago

४) मानव्यविद्या म्हणजे काय हे लिहून त्याचे स्वरूप स्पष्ट करा. BA/bcom​

Answers

Answered by likefreefire1
39

मानव्यविद्या हा शब्द इंग्रजी भाषेतील ह्युमॅनिटीज ह्या

शब्दावरून आलेला आहे. ह्युमॅनिटीज (Humanities) ह्या शब्दाचे मूळ ह्युमॅनिटस् (Humanitas) ह्या लॅटिन शब्दामध्ये आहे. ह्युमॅनिटस् ह्या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे मानवासंबंधीचे ज्ञान. म्हणजेच मानवी मनात निर्माण होणाऱ्या विविध भाव-भावना, त्यांचे वेगवेगळ्या स्वरूपात होणारे आविष्कार यांचा अभ्यास, तसेच मानवी विचारधारा, त्यातून निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या मतप्रणाली, मानवी जीवनाचा आवश्यक भाग असलेली मानवी मूल्ये ह्यांचा अभ्यास करणारी बृहत ज्ञानशाखा म्हणजे 'मानव्यविद्या') थोडक्यात जे जे काही मानवासंबंधी, मनुष्य जातीशी निगडित आहे त्याचा अभ्यास ही मानव्यविद्या या ज्ञानशाखेची व्याप्ती आहे. ज्या अभ्यासविषयातून मानव किंवा मनुष्य ही संज्ञा वेगळी करता येणार नाही त्या सर्व ज्ञानशाखांचा अंतर्भाव मानव्यविद्यांमध्ये करता येईल. त्यामध्ये प्रामुख्याने प्राचीन व आधुनिक भाषा व त्यांचा अभ्यास करणारे साहित्य, कला, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र आणि काही अंशी मानववंशशास्त्र ह्या विषयांचा अभ्यास अभिप्रेत आहे.

'मानव्यविद्या' ही संकल्पना कशी आणि केव्हा प्रचलित झाली, तसेच 'मानव्यविद्या' ह्या पदाची व्याप्ती कशी विकसित होत गेली, इत्यादी मुद्यांचा विचार करणे योग्य ठरेल. त्यातूनच मानव्यविद्यांचे स्वरूपही उलगडत जाईल.

मानव्यविद्या - स्वरूप व व्याप्ती

सिसेरो (ख्रि.पू. १०६-४३) ह्या रोमन तत्त्वचिंतकाने ह्युमॅनिटस् (Humanitas) ही संज्ञा प्रथम प्रचलित केली असे म्हणता येईल. ह्युमॅनिटस् ह्या शब्दाचा मूळ लॅटिन भाषेतील अर्थ जरी मानवी किंवा मानवासंबंधी असा असला तरी सिसेरो यांनी मानव्यविद्या हे पद विशिष्ट प्रकारचा शैक्षणिक कार्यक्रम निदर्शनास आणण्यासाठी वापरले. आदर्श वक्त्याने कोणते शिक्षण घ्यावे किंवा आदर्श वक्ता कसा असावा ह्यासाठी त्यांनी मानव्यविद्यांचा विचार केला. 'मानव्यविद्या' ह्या संज्ञेचा पहिला वापर आदर्श वक्त्याच्या संदर्भात करण्यात आला.

पण, सिसेरो ह्यांच्यानंतर मध्ययुगात मानव्यविद्या हे पद शैक्षणिक धोरणातून वगळले गेले. १५ व्या शतकात जेव्हा ज्ञानाचे पुनरुज्जीवन झाले. तेव्हा इतर ज्ञानाबरोबर मानव्यविद्यांचीही जगाला नवीन ओळख झाली. तमोयुगातून सर्व ज्ञान पुन्हा प्रकाशात आले. ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेला 'प्रबोधन' (Renaissance) असे म्हणतात. हे पुनरुज्जीवन मुख्यतः कला, धर्म, विज्ञान व तत्त्वज्ञान ह्या ज्ञानशाखामध्ये झाले; आणि ह्या सर्वांचा परिपाक म्हणून मानवतावादाचा उदय झाला. ह्या मानवतावादाचा केंद्रबिंदू अर्थातच होता. तेव्हा 'प्रबोधन' ह्या प्रक्रियेचा आता आपण थोडक्यात विचार करू. त्या आधारे आपल्या आधुनिक काळातील मानव्यविद्यांच्या स्वरूपाविषयी माहिती मिळेल. तसेच मानव्यविद्या ह्या विज्ञानांहून भिन्न कशा हे समजण्यासही मदत होईल."

Answered by babasaheb54
6

Answer:

इतिहास ,पुरातत्व ,समाजशास्त्र, मानवशास्त्र ,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारखे ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांचा अभ्यास आवश्यक भाग आहे

तंत्रज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखांची जननी मानली जाते.

Similar questions