India Languages, asked by TransitionState, 11 months ago

मी पाहिलेली जत्रा, आमच्या गावची जत्रा मराठी निबंध, भाषण

Answers

Answered by fistshelter
59

Answer: दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत माझ्या मामाच्या गावी मोठी जत्रा भरते. सुटी लागताच आम्हाला गावी जाण्याचे वेध लागतात.

जत्रेच्या दिवशी घरात पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. मंदिरात जाऊन नैवैद्य दाखवला जातो. जत्रेनिमित्त नातेवाईक घरी येतात. गावात विविध प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी बाजार लागलेला असतो. आकाशपाळण्यात बसण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. विविध प्रकारचा खाऊ घेऊन विक्रेते बसलेले असतात. जत्रेत रात्री समाजप्रबोधनपर चित्रपट दाखवला जातो.

अशी ही आनंददायी जत्रा मला फार आवडते.

Explanation:

Answered by goudmaheshwari
16

Answer:

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध क्रमांक २

आमच्या रामपूर गावामध्ये पाऊस महिन्यात देवीचा मोठा उत्सव असतो. ही देवी नवसाला पावणारी असल्यामुळे आजूबाजूच्या गावातून लांबून लांबून आणि भाविक आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात. तारा गाव अगदी गजबजून गेलेला असतो. गावातील लोक आधीपासूनच या उत्सवाची तयारी करू लागतात. देऊळ स्वच्छ करणे, रंगरंगोटी करणे, मंडप घालने वगैरे सर्व तयारी केली जाते. देवळाच्या समोर पेढे, प्रसाद, मिठाई, खेळणी वगैरे दुकानाची दुकाने ओळीने मांडलेली असतात. मुलांसाठी मोठे पाळणे, गोल चक्र वगैरे खेळ असतात. तसेच माकडवाला डोंबारी यांचे खेळ पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झालेली असते. पिपाण्या, बँडबाजे, ढोलकी यांच्या आवाजाने सारा परिसर भरून राहिलेला असतो.

उत्सवाच्या दिवशी सर्वांना महाप्रसादाचे जेवण देण्यात येते. गावकऱ्यांना रोजच्या कष्टमय जीवनात या उत्सवा मधून आनंद मिळत असतो. त्यामुळे गावातील लोकांना या जत्रेचे फारच महत्व आणि श्रद्धा भाव इथे प्रकर्षाने दिसून येतो

Explanation:

Hope it's helpful

Similar questions