मी पाहिलेला खेळ – मराठी निबंध, भाषण, लेख
Answers
Answer:
samajh me nhi aa rahi he
Answer:
आपल्याला शाळेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर निबंध विचारले जातात. त्यापैकीच आपण इथे ‘वर्णनात्मक निबंध’ या विषयावर निबंध पाहणार आहोत. यामध्ये माझ्या गावची जत्रा, मी पाहिलेला खेळ, पावसाळ्यातील गमती जमती, मी केलेली सहल, माझी आजी या प्रकारचे निबंध यामध्ये विचारले जातात. इथे आपण मी पाहिलेला खेळ या विषयावर निबंध पाहणार आहोत.
मी पाहिलेला खेळ मराठी निबंध, भाषण, लेख
परवाच आमच्या शाळेमध्ये खो-खो, कबड्डी, ऍथलेटिक्स, फुटबॉल, हॉकीचे सामने झाले. बऱ्याच दिवसांनी स्पर्धा होत असल्याने सामने पाहायला बरीच गर्दी जमली होती कारण शाळेने पालकांना पण या स्पर्धा पाहण्याची परवानगी दिली होती. संपूर्ण शाळेचे खेळाचे मैदान हे खचाखच भरले होते की पाहणाऱ्याने चकित व्हावे. खेळाडू देखील खूपच उत्तेजित झाले होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ते एका बाजूला सराव करीत होते. काही खेळाडू खेळण्यासाठी रिंगणात उतरले होते.
खो-खो चा सामना चालू झाला. दोन्ही संघ एकमेकांना फितवण्याचा, चुकवण्याचा प्रयत्न करीत होते. एक संघ बसला होता व दुसरा संघ पळण्यासाठी तयार होता. पहिली जोडी पळू लागताच शिट्ट्या वाजवून अम्पायरनी खेळ सुरु करण्याची सूचना केली. प्रेक्षकांनी ही टाळ्या वाजवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. दोन्ही संघ हे भरपूर तयारीनेच खेळासाठी उतरले होते. शेवटी रस्सीखेच सुरु झाली.
नंतर बसलेला संघ पळू लागला व पळणारा संघ बसला शेवटी एक संघ विजयी झाला. विजयी संघाचे कौतुक झाले. नंतर कबड्डीसाठी दुसरे दोन संघ मैदानात उतरले. एक संघ पुण्याचा तर दुसरा संघ मुंबईचा होता. दोन्ही संघ एकमेकांना चितपट करत होते. अगदी चुरशीचा सामना सुरु होता. प्रेक्षकदेखील श्वास रोखून बसले होते. दोन्ही संघ सेमी फायनलमध्ये सरस ठरले होते.फायनलला मुंबईच्या संघाने २-३ अशी पुणे संघावर मात करत विजय प्रस्थापित केला. त्यामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत आनंदोत्सव साजरा केला.