India Languages, asked by man6525, 11 months ago

मी पाहीलेला पावसाळ मराठी निबंध​

Answers

Answered by halamadrid
0

Answer:

पावसाळा हा जवळजवळ सगळ्यांचाच आवडता ऋतू आहे.प्रत्येकजण पावसाळ्याचा आनंद घेत असतो.एकदा मी भिवपुरी धबधब्यावर गेली होती,तिथे पडलेला परतीचा पाऊस मला अजून ही आठवण आहे.

आम्ही भावंडांनी एकदा ऑक्टोबर महिन्यात भिवपुरी धबधब्यावर जायचे ठरवले होते.ऑक्टोबर महिना असल्यामुळे,तिथे आम्हाला ऊन्हाचा त्रास तर होत होता,पण जसजसे आम्ही धबधब्याच्या जवळ जात होतो,तसतसे मनातील उत्साह वाढत होता.

तिथे पोहोचल्यावर आम्ही सगळे धबधब्याच्या खाली भिजायला सुरुवात केली.आम्ही खूप मजा करत होतो,फोटो काढत होतो,एकमेकांना भिजवत होतो.हळूहळू संध्याकाळ होऊ लागली,तसेच वातावरणात ही बदल होऊ लागले.काळे ढग आकाशात गडगडू लागले,जोरजोरात वारा वाहू लागला,तेवढ्यातच पावसाने हजेरी लावली.

पाऊस येताच आमचा उत्साह अजून वाढला,आम्ही सागळेजण सगळे काही विसरून पावसाच्या पाण्यात नाचू लागलो.असे वाटत होते जणू काही तिथून निघायलाच नको.सागळेजण पावसाचा आनंद घेत होते.

तितक्यातच वीजा चमकू लागल्या.त्या जोरजोरात चमकणाऱ्या विजेच्या आवाजाने आम्ही सगळेच घाबरलो.तेव्हा,सगळ्यांनी घरी जायची घाई केली.घरी येतानासुद्धा आम्ही धबधब्यावर केलेल्या मजेबद्दल बोलत होतो.

आता या गोष्टीला बरेच वर्ष झाली आहेत,पण मी पाहिलेला हा पावसाळा मला अजून ही नीट आठवण आहे.

Explanation:

Similar questions
Math, 11 months ago