मी पाहिलेला समुद्रकिनारा या विषयावर 7 ते 8 वाक्ये लिहा.
Answers
Explanation:
सर्च ऑन गूगल वीरगति और आंसर
Answer:
मी पाहिलेला समुद्रकिनारा
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी बघणार आहोत. मला संध्याकाळी एखाद्या नैसर्गिक ठिकाणी जायला आवडते. हिरवेगार मैदान, पर्वतीय प्रदेश, मंदिरे, नदीकाठ आणि समुद्रकिनारे यासारख्या बर्याच ठिकाणी मी जात असतो . अश्याच एका मनमोहक समुद्रकिनाऱ्याचे वर्णन पुढील निबंधात केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला
अथांग निळा सागर, त्याच्या उसळणाऱ्या लाटा, त्यांच्यावर दिसणारा पांढरा फेस अशा या विलोभनीय दृश्याचे मला विलक्षण आकर्षण वाटते. त्या फेसाळणाऱ्या लाटा पुढे पुढे येतात आणि सागराच्या किनाऱ्याला शिवून मागे फिरतात, तेव्हा एक लाट केव्हा संपली आणि दुसरी केव्हा सुरू झाली हे उमगतच नाही. लाटांचा हा पाठशिवणीचा खेळ मनसोक्तपणे पाहावा हा माझा छंद.
ओहोटीच्या वेळी पसरलेला तो अफाट मोठा वाळूचा किनारा आणि भरतीच्या वेळी त्याला गिळू पाहणारा तो सागर, हे परस्परांशी जणू गप्पाच मारीत आहेत असे मला वाटते. त्यांचा तो संवाद शब्दाविना असला तरी तो माझ्या मनाला उमगतो आणि मग अनेकदा मी समुद्राच्या सान्निध्यात जातो
Explanation:
Mark as brilliant