मी पंतप्रधान झालो तर
Answers
Answer:
मी पंतप्रधान झालो तर … " देवा खरच एक दिवस का होईना पण दे रे सत्ता हाती.
वैतागालोय रे खूप आता. काही चांगली बातमी कळेल म्हणून रोज न चुकता बातम्या पाहतो, मराठी हिंदी अन अगदी इंग्रजी सुद्द्धा… पण रोज.. हो रोजंच कोणानाकोणा घोटाळ्याची बातमी. मला तर वर्षात दिवस कमी अन घोटाळेच जास्त दिसताहेत. हसू नकोस खर आहे हे.
लहानपणी आजी ना म्हणी सांगायची, "कुंपण शेत खातंय" तुझ्या हि आजीने सांगितली असेल हि म्हण तुला. आज परिस्थिती याच्याही पुढे गेलीय, "शेत खाउन पुढारी मस्त ढेकर देऊन बसलेत वर कुंपणाच्या कॉट्रक्टचे पैसे पुढार्यांच्या निकटवर्तीयांना ५-१० वेळेस मिळालेही पण कुंपण अजून दिसत नाही अन दिसणारही नाही. "
चोर अन पोलिस फरकच काही दिसत नाही, रक्षकच भक्षक झालेत. दिवसा ढवळ्या मुलींची इज्जत लुटली जाते. जाती पातीच्या राजकारणात सर्वांचा भुगा पाडला जातोय. जीव ओवाळून टाकायला तयार असे "कार्यकर्ते" आहेत पण जीव कोणासाठी ओवाळून टाकावा हि "अक्कल" त्यांना नाही. पूर्वी चौकातल्या पारावर व्हायची ती चर्चा आता फेसबुक च्या भिंतीवर होते. तरुण वर्ग तरी काय करणार. रोज एखाद्या
घोटाळयाच्या पोस्ट वर टिपण्णी देऊन शिव्यादेत शांत बसणार. कारण सर्वांनाच माहित आहे कि काही फरक पडणार नाही.
आज तर हद्दच झाली. पंतप्रधान म्हणाले "जो गरजते हे, वो बरजते नही ॥" हसावं की रडावं तेच कळत नव्हत. ९ वर्ष गप्प होते काय दिवे लावले कुणास ठाऊक. हो पण या दिव्याखाली अंधार म्हणून बाकीच्या मंत्रांनी पोटभर घोटाळे करून घेतले हे मात्र खर.
देव मला खरच इतिहासात रमून नाही बसायचं, पुढच्या पिढीसाठी इतिहास घडवायचाय. माझ्याकडे जादूची छडी नाही कि जेणे मी एका दिवसात सगळ ठीक करेल पण "नायक" बनून एका दिवसात अपराध्यांचा/घोटाळेखोरांचा कर्दनकाळ नक्कीच बनेल. अन खर सांगू का देवां मी या जगातील चांगल्या लोकांना बोलत करेल कारण..कारण वाईट लोक हे प्रोब्लेम नव्हतेच कधी. कारण वाईट हि एक प्रवृत्ती आहे अन ती राहणारच. प्रोब्लेम आहे तो चांगल्या लोकांचा अबोला. अन जेव्हा ते हा सोडतील तेव्हा परत कोणास तुला अशी विनंती करायची गरज पडणार नाही.
बघ बाबा, मी तुला माझा पूर्ण कार्यक्रम सांगितला. आता कर माझी इच्छा पूर्ण.. अन हो कार्यक्रम पत्रिका दाखवून आश्वासन विसरायला मी कोणी राजकीय पुढारी नाही हं ...
Hope it helps you...
⠀⠀⠀⠀⠀⠀मी पंतप्रधान झालो तर
रोज वर्तमानपत्र वाचल्यावर किंवा दूरचित्रवाणीवरील बातम्या ऐकल्यावर अनेकदा संताप येतो, मन उद्विग्न होते. मनात येतं, हे काय चाललंय आपल्या देशात? आता आपला देश स्वतंत्र होऊन जवळजवळ साठ वर्ष होत आली, तरी आजही आपल्या स्वराज्याचं सुराज्य का होऊ शकलं नाही. खरंच, मी पंतप्रधान झालो तर या भारतात सुराज्य निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीन.
जगातली एक मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. पण जांच आपल्या देशात लोकशाही आहे का? लोकशाही यशस्वी होण्यासाठी देशातील नागरिक सुशिक्षित हवेत, सुजाण हवेत. त्यांना देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीतील आपल्या एका मताचं महत्त्व कळायला हवं आणि ते तेव्हाच कळेल, जेव्हा सगळे लोक सुशिक्षित होतील. मी पंतप्रधान झालो तर देशात शंभर टक्के साक्षरता आणण्याचा प्रयत्न करीन. या उपक्रमाला अग्रस्थान देईन. मला खात्री आहे की, आपण आपल्या देशातून निरक्षरता हद्दपार केली, तर आपल्याला देशातील बऱ्याच समस्यांवर मात करता येईल. आजही आपल्या समाजात अंधश्रद्धा फार मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. श्रद्धेच्या नावाखाली अनेक भयानक गोष्टी घडत असतात. यात्रेच्या ठिकाणी तर श्रद्धेचा बाजार मांडला जातो आणि कित्येक वेळेला चेंगराचेंगरीत शेकडो जीवांचं मरण ओढवतं. मूठभर लोकांकडून अनेकांवर अन्याय केला जातो. पिळवणूक केली जाते. गरिबांना धनिकांकडून पिडलं जातं. बालमजुरांची समस्या आजही मोठ्या प्रमाणात आढळते. मी पंतप्रधान झालो तर प्रथम या सर्वच समस्यांच्या मुळाशी जाईन आणि त्या हद्दपार करण्यासाठी झटेन. आपल्या देशाला आज ग्रासणारी सर्वांत मोठी समस्या म्हणजे 'भ्रष्टाचार'.
भारताच्या सर्वांगीण विकासातील हा भ्रष्टाचारच फार मोठा अडथळा आहे. हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठीच मला पंतप्रधान व्हायचं आहे. माझ्या मनात माझ्या समृद्ध भारतमातेचे एक मनोरम चित्र आहे. माझी ही मातृभू एके काळी सुवर्णभूमी होती, साऱ्या विश्वात ती ज्ञानाचं केंद्र होती, असे उल्लेख प्राचीन काळातील प्रवाशांनी लिहून ठेवलेले आहेत. ते वैभव मी माझ्या या प्रिय भारतभूला पुन्हा प्राप्त करून देईन. त्यासाठी एक दिवस तरी पंतप्रधान झालो पाहिजे !