India Languages, asked by vijudevamale, 5 hours ago

"मी पक्षी झाले
तर nibhand​

Answers

Answered by janhavi2319
3

Explanation:

लहानपणापासून मला पक्ष्यांविषयी खूप आकर्षण आहे. अगदी लहानपणीही मी अंगणात येणाऱ्या पक्ष्यांकडे एकटक पाहत बसत असे आणि जरा मोठी झाल्यावर वाचता येऊ लागल्यावर मी पक्ष्यान्विशायीची खूप माहिती गोळा करू लागले. तेव्हा मला पक्शिजीवानाची खूप ओळख झाली पण त्याच बरोबर त्यांच्यातील विविधताही कळली. माझा हा छंद ओळखून माज्या बाबांनी मला एक छान दुर्बीण आणून दिली आहे. त्यामुळे उंच उडणार्या पक्ष्यांचेही मी आता चांगले निरीक्षण करू शकते.

असाच एकदा पक्षी पाहत असताना माज्या मनात आल, “खरच मी स्वतहा पक्षी झालो तर...’ मला सुंदर पंख मिळतील, माझ अंग मऊ मऊ असेल, माझा रंग आकर्षक असेल, कदाचित डोक्यावर तुरा किव्हा लांब शेपटीहि असेल.

पक्षी झाल्यावर मी माझे पंख पसरवून शांतपणे आकाशात विहार करेन. पंख फडफडवत कमी उंचीवरून उडणारे पक्षी मला विशेष आवडत नाहीत; पण उंच आकाशात आपले पंख पसरून शांतपणे उडणारे पक्षी मला फार आवडतात. हे पक्षी ऋतूप्रमाणे आपले देश बदलत असतात. त्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास ते करतात. मी पक्षी झाले तर अशीच विविध देशांना भेटी देईन. प्रवास करायला मला खूप आवडता. शिवाय पक्षी झालो तर या गावावरून त्या गावी जायला तीकिट काढायला नको कि, एका देशातून दुसऱ्या देशात जायला पासपोर्ट नको किंव्हा व्हीसापण नको, जगातील सर्व महत्वाच्या आणि सुंदर स्थळांना मी भेटी देईन. दमले कि झाडावर बसेन. आवडतील ती फळे खाईन. मनाला वाटेल तिथे पाणी पिईन. एकूण काय सगळा आनंदी आनंद.. स्वातंत्र...

पक्षी झाल्यावर परीक्षेची काळजी नाही, अभ्यासाची कटकट नाही, पुढे कोणत्या प्रकारच शिक्षण नाही. नोकरी कि व्यवसाय हि चिंता नाही, घराचा, जागेचा प्रश्न नाही. शहरातील गर्दी नाही. पण... पण... मनात आल, त्या पक्ष्याच्या जगातसुद्धा काही प्रश्न असतीलच. कोणत्या झाडावर कोणी राहावे, याबाबत नियम असतीलच आपल्यासारख्या आंगतुकला ते सामावून घेतील का? आपण पक्षी होऊन वेगवेगळे देश पहिले, तर त्याचं वर्णन आपण कोणाला सांगणार? कारण पक्ष्यांना त्याच कौतुक वाटणार नाही. आपल्या प्रवासच वर्णन आपण लिहू शकणार नाही. बापरे.. कसला हे जीवन चित्र काढता येणार नाही... साधा फोटो घेता येणार नाही... नको रे बाबा पक्षी होण मी आपली माणूस आहे तीच बरी आहे.

समाप्त.

Similar questions