ma pe nebanda chaye marthi me
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या सर्वांसाठी आपल्यांना सर्वात प्रिय असणारी व्यक्ती म्हणजेच आपली आई वर माझी आई हा मराठी निबंध घेऊन आला आहे. तर मित्रांनो माझी आई हा मराठी निबंध आपल्या सर्वांना आपल्या आई प्रमाणे आवडेल अशी आशा आहे.
तर चला मित्रांनो मझी आई ह्या मराठी निबंधाला सुरवात करूया.जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रतेक क्षणाला आईच आपल्यांना कठीण परीस्तिथी मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे.
माझ्या आईच नाव “वंदना केशव राव” आहे. माझ्या आई बदल सांगायच झाल तर शब्द कमी पडतील, तरीही मी माझ्या आई बदल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोमला लक्षात आहे जेव्हा मि लहान होतो म्हणजे मि शाळेत जायला सुरवातच केली होती, पण तुमच्या प्रमाणे मला ही शाळेत जायला त्यावेळी काही आवडेना. मि घरी शाळेत नाय जायचा हट्ट करायचा आणी शाळेत न जाण्यासाठी रडायचा. मि रडायला लागला कि माझे बाबा मला ओरडायला सुरवात करायचे आणि आई येऊन मला समजवत असे कि बाला असे शाळेत जायला रडू नये, आणि तिच्या मायेने मि शांत होऊन शाळेत जायचा. माझी आई मला स्वता शाळेत सोडायला व घ्यायला येत असे.
आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते.
शाळेचा अभ्यास असेल किंव्हा आयुष्यामदे काही अडचण असेल तर सर्वात आधी मदत करणारी आईच असते. कधी आपल्यांना बर नसेल तर रात्रभर जागून आपली देखबाल करणारी आईच असते. स्वताचा घास न खाता आपल्या मुलांना देणारी वेक्ती म्हणजे आईच असते.
आई हा ममतेचा सागर आहे, आपल्यावर झालेले संस्करणमदे आपल्या आईचा मोठा वाटा असतो. आई नेहमी आपल्या मुलांनवर आयुषभर चंगले संस्कार करते. आपल्या आईची तुलना जगातल्या कोणाशी हि करता येणार नाही अशी आपली आई असते.
माझ्या साठी माझी आईच माझ सगळ काही आहे, तीच माझा देव आहे. संपूर्ण जगात मला सगळ्यात जास्ती प्रेम आहे तर ते माझ्या आईवर. तिची माझ्या वर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. आयुष्यात कधी काही लागल तर होठा वर येणार पहिला शब्द म्हणजे “आईग”. मला मझी आई खूप प्रिय आहे व मला माझी आई खूप-खूप आवडते.
धन्यवाद