History, asked by avhadpayal607, 9 months ago

२) मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?​

Answers

Answered by Anonymous
10

Answer:

मार्क्सवाद" हा एक विचार आहे. त्या मुळे प्रत्येक विषयाचे आकलन ते "मार्क्सवादी" पद्धतीने करतात. मग देशाची आर्थिक परिस्थिती असो, सामाजिक परिस्थिती असो किंवा देशात होणारे अपराध या सगळ्याची उत्तरे ते "वर्ग संघर्षात" शोधतात.याच पद्धतीने इतिहासाचे आकलन पण "मार्क्सवादी" पद्धतीने करतात. आता खरे तर हिटलर आणि स्टालिन हे दोघांनी आपल्या कार्यकाळात मोठा नरसंहार आणि आपल्या देशातील नागरिकांवर अत्याचार केलेत. पण मर्क्सवाद्यांकरता हिटलर हा सगळ्यात मोठा राक्षस ठरतो आणि स्टालिननने केलेले अत्याचार ही राजकीय मजबुरी होती, हे यांच्या इतिहासाचे आकलन असते. मग लेनिन, माओ, फिडेल यांनी तर काहीच पाप केलेले नसते.भारताच्या इतिहासात पण यांनी त्यांचे "मार्क्सवादी आकलन" करतांना वैचारिक कोलांट्या कश्या मारल्या आहेत ते बघा. मार्क्सवादी मंडळी या भूमीला फक्त एक तुकडा मानतात, ज्यावर असंख्य लोक येऊन स्थायिक झाले आहेत. आर्य बाहेरून भारतात आले आणि त्यांनी उत्पन्नाची साधने इथल्या मूलनिवासी जनतेकडून बळकावली व पुढे त्यांनी ह्या उत्पन्नाच्या साधनावर आपला वांशिक अधिकार प्रस्थापित करून मूळ निवासी वंशाला वंचित ठेवले. आर्य मूलनिवासी भेद हा मार्क्सच्या वर्ग संघर्षाच्या परिमाणात मोजण्याचे काम या मांडणीतून करतात.भारतातील ब्रिटीश विरोधातील लढा देखील हा अशाच प्रकारचा वर्गसंघर्ष होता, अशी मांडणी करतात. ब्रिटीश आणि जमीनदार यांच्या गुलामगिरी विरोधातील लढा देणारे कामगार, सैनिक आणि जमीन कसणारे यांचा संघर्ष म्हणजे भारताचा स्वतंत्र्यता संग्राम, हेच सांगण्याचा प्रयत्न करतात आणि भारतात भांडवल तयार करत, ब्रिटिशांना त्यांच्या भाषेत उत्तर देणाऱ्या किंवा ब्रिटिशांच्या भारतीय संस्कृतीला कमअस्सल दाखवण्याच्या प्रयत्नांना सांस्कृतिक उत्तर देत त्यांच्यावर कुरघोडी करणाऱ्या लोकांना मात्र ते सरळ सरळ उजव्या विचारधारेचे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मारक अशी मांडणी करतात.

Answered by shambhunathdhavan
0

Answer:

Explanation:

1474447

Similar questions