मी सूर्य बोलतोय मराठी निबंध
Answers
मी सूर्य बोलतोय निबंध ....
नमस्कार मित्रहो मी बोलतोय ..
हो मीच तुम्हाला दिवसभर प्रकाश दॆनारा, उन्हळ्यात नको वाटनारा पन थंडीत तुम्ही ज्याची वाट बघता तो सुर्य..
माझ्यबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणॆ
माझ्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. माझ सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. माझ्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला ४ दशलक्ष टन वस्तुमान हे माझ्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. ५०० कोटी वर्षांनी मी एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू(White Dwarf) ही शेवटची अवस्था असेल.
मी हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. मला स्वत:चे प्रखर चुंबकीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र दर वर्षी बदलते व दर अकरा वर्षांनी त्याची दिशा उलट होते. माझ्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे माझ्या पृष्ठभागावर सौरडाग (Sunspots) व सौरज्वाला(Solar flames) तयार होतात तसेच सौरवातामध्ये बदल घडतात. माझ्यावरील ह्या घडामोडींमुळे रेडिओ लहरींचे दळणवळण व विद्युत्&zwnjवहनामध्ये व्यत्यय निर्माण होतात. पृथ्वीच्या वातावरणात मध्यम ते अति उंचीवर घडणारे आणि चुंबकीय ध्रुवांजवळ दिसून येणारे "अरोरा" (Aurora) हेही ह्याच घडामोडींचा परिणाम आहेत. या सौर घडामोडींचा सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीमध्ये फार मोठा वाटा आहे. या घडामोडी पृथ्वीच्या बाह्यवातावरणातही मोठा बदल घडवतात.
अशाप्रकारॆ मी खुप व्यस्त असतो, तुम्हाला माझ्यामुळॆ उन्हाळ्यात त्रास होतो त्यासाठी मी माफी मागतो.
Answer :-
मी सूर्य बोलतोय....
भर दुपारी डोक्याला गमचा किंवा टोपी घालून परीक्षेला जाणारी पोरं मी नेहमीच पाहतो. कुणी रस्त्यातच कुल्फी खातं तर कुणी बर्फ गोळा चोखत बसतं. पण माझ्या या तीव्र उन्हाने प्रत्येकालाच त्रास होतो. त्याबद्दल मी आताच दिलगीर व्यक्त करतो. अहो, काय झालं? मी तर आग ओकणारा गोळा सूर्य बोलत आहे.
मी काय करतो? मी फक्त आग ओकून तुम्हांला त्रासच देतो असं नाही तर मी बरीच तुमच्या भल्याची कामे पण करतो. मी सर्व झाडांना त्यांच्या अन्ननिर्मिती साठी माझा प्रकाश देतो. तसंच थंडीत कुडकुडणाऱ्यांना ऊब देतो. मी बऱ्याच कारखान्यांचं वीजबिल ही वाचवतो. म्हणजे मी सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतो. आजून किती काम सांगू मी माझं!
माझं तुमच्या सगळ्यांच्या जीवनात खूप महत्त्व आहे. मी तुमच्यासाठी खूप काही करतो. अगदी ऊब देण्यापासून ते ऊर्जा निर्माण करे पर्यंत! मला हे काम करावंच लागतं. कारण माहितेय? फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठीच मी दररोज न चुकता लाखो अंतर पार करून उगवतो आणि पुन्हा मावळतो! आजून काय करू मी!
कधी कधी वाटतं की जर मी नसतो तर काय झालं असतं या पृथ्वीचं. सगळीकडे अंधार पसरला असता. सारं जग बुडालं असतं. कोणालाच विजेचा शोध लागेपर्यंत काहीच दिसलं नसतं. अहो, मला सांगितलंय माझ्या लहान भावानं, तुमच्या चांदो मामानं! नाईट शिफ्ट असणाऱ्यांची जरा लाईट गेली, की कशी तारांबळ उडते ते. मी माझं कौतुक करत नाहीये. पण तुम्हांला सावधानतेचा इशारा नक्कीच देतोय!
मी एवढं सगळं करतो तुमच्यासाठी. खरं तर खूप थकून जातो मी! पण मला आनंद आहे, की मी तुमच्या उपयोगी येतो. पण तरीही उराशी एक दु : ख बाळगून असतो मी. दु : ख याचंच की माणूस एवढा स्वार्थी आहे, की तो त्याच्यासाठी आवश्यक गोष्टीलाही संपवायला मागे - पुढे पाहत नाही. किती कत्तल करता तुम्ही झाडांची! तुम्हांला धक्का बसला असेल हे ऐकून ; पण आमची देखील एक साखळीच आहे. त्यातला एक जरी तुकडा बाजूला झाला तर अख्खी साखळीच तुटून पडू शकते.
असो! खूप वेळ झाला तुमच्याशी बोलून. मी तुमच्यावर दु : खी नक्कीच आहे ; पण मी माझं काम मात्र सोडणार नाही. पुन्हा कधीतरी बोलू जर तुम्ही मला जिवंत ठेवलं तर! तोपर्यंत राम - राम!
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.