Social Sciences, asked by 918425911795, 9 days ago

मिश्रण म्हणजे काय ते सांगुन त्याचे प्रकार लिहा?​

Answers

Answered by naikashok678
0

Answer:

mixture

Explanation:

because we say in english mixture

Answered by VIHAR369
0

Answer:

udharhan- वायू

Explanation:

दोन किंवा अधिक निराळे रासायनिक पदार्थ एकत्रित करून मिश्रण तयार होते. मिश्रणाच्या अवस्थेत त्यातील भिन्न घटक आपापले भिन्न गुणधर्म टिकवून ठेवतात. घटकांचे परस्पर प्रमाण कितीही भिन्न असले, घटकांचे कण लहान मोठे असले व ते एकमेकांत कितीही मिसळण्याचा प्रयत्न, केला तरी घटकांची गुणभिन्नता कायमच राहते. घटकांचे कण जेवढे अधिकाधिक लहान करावेत आणि ते जेवढे चांगले एकत्रित करावेत तेवढे ते मिश्रण एकजिनसी होऊ लागते. मिश्रणे बहुजिनसी वा एकजिनसीही असू शकतात. मिश्रणाच्या घटकात जोवर रासायनिक विक्रिया संभवत नाही तोवरच त्याला मिश्रण ही संज्ञा लावली जाते. मिश्रण वायुरूप, द्रवरूप, घनरूप वा वायु-द्रव, द्रव-द्रव, द्रव-घन इ. मिश्र स्वरूपाचे असू शकेल. हवा हे वायूंचे बहुजिनसी मिश्रण आहे. गढूळ पाणी हे माती व पाण्याचे मिश्रण असते. रूबी, नीलमणी इ. रत्ने वस्तुतः घन मिश्रणे आहेत.

गाळणे, बाष्पीभवन करणे इ. भौतिक पद्धतींनी मिश्रणाचे घटक वेगवेगळे करता येतात. तत्त्वतः मिश्रणातील घटकांचे असे विलगीकरण नेहमी संभवते पण व्यवहारात प्रत्यक्ष ते करणे थोडे फार कठीण असते व ते कमी अधिक प्रमाणात पूर्णत्वास जाते.

मिश्रणाच्या घटकांत कमी अधिक आकर्षण वा प्रतिसारण असल्यास मिश्रणावर या गुणांचा प्रभाव पडतो आणि मिश्रणात तो सर्वत्र जाणवतो. उदा., दोन द्रव मिसळल्यास मिश्रणाचे घनफळ त्या घटक द्रव्यांच्या घनफळांच्या बेरजेएवढेच असेल असे नव्हे त्यापेक्षा कमी किंवा अधिक असू शकेल. दैनंदिन जीवनात व उद्योगक्षेत्रात मिश्रणे तयार करणे व मिश्रणाचे घटक विलग करणे या नित्य परिचयाच्या बाबी आहेत.

Similar questions