India Languages, asked by Preethachandran5064, 11 months ago

मातृभाषेचे उपकार निबंध मराठी

Answers

Answered by devanshiraghav111
2

Answer:

what's this question

which language is this I can't understand it.........

Answered by ItsShree44
2

Answer:

माणूस जन्माला येतो तोच मुळी माथ्यावर अनेकविध ऋणांचे ओझे घेऊनच ! त्या अनेक ऋणांपैकी एक न फेडता येणारे ऋण म्हणजे- मातृभाषेचे ऋण ! अशी कल्पना करा की, माणसाला मातृभाषा गवसलीच नसती तर त्याने काय केले असते? बाळाने आईजवळ आपला हट्ट कसा काय व्यक्त केला असता? आपल्या भावना, वेदना, आपल्याला हवे नको इत्यादी व्यक्त करण्यासाठी त्याने कशाचा आधार घेतला असता?

बाळाला त्याच्या आई-बाबांकडून, आजोबा-आजीकडून मातृभाषेचा वारसा लाभतो. बाळ पाळण्यात असते, तेव्हा त्याच्या कानांवर अंगाईगीत पडते ते त्याच्या आईच्या भाषेतूनच. तो चिऊकाऊच्या गोष्टी ऐकतो त्याही मातृभाषेतूनच. मग आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्या बोबड्या बोलांतून तो गाऊ लागतो, 'चांदोबा, चांदोबा भागलास का?' अशी ही मातृभाषा आपल्याला आपल्या जन्मापासून सदैव सोबत करते. व्यक्तीच्या जीवनात मातेचे व मायभूमीचे जेवढे महत्त्व असते तेवढेच त्याच्या मातृभाषेचेही असते. कारण मातृभाषा त्याच्यावर सुयोग्य संस्कार करत असते. या संस्कारांतून त्याचे व्यक्तिमत्त्व विकसित होते, फुलते, संपन्न होते. ज्ञानदेवांनी मातृभाषेचे हे सामर्थ्य जाणले होते, म्हणूनच त्यांनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान मराठीतून सांगण्याचा संकल्प सोडला. नाथांना मातृभाषेची ही थोरवी कळली होती, म्हणून तर त्यांनी समाजाचा विरोध सहन करूनही मातृभाषेतच काव्यरचना करण्याचा आग्रह धरला. मातृभाषेतून आपले विचार रोखठोकपणे व विलक्षण तळमळीने व्यक्त करून तुकाराम महाराजांनी अभंगरचना केली आणि समाजप्रबोधनासाठी समर्थांना देखील ही मातृभाषाच उपयोगी पडली.

मातृभाषेतून आपल्या विचारांचे व भावनांचे आदानप्रदान सहजपणे करता येते; म्हणून मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असले पाहिजे. आपण कोणत्याही विषयासंबंधी विचार करतो, तोच मुळी मातृभाषेतूनच ! मात्र परक्या भाषेतून शिक्षण घेताना ती भाषा अभ्यासण्यात आपली शक्ती नाहक खर्च होते. आजची प्रगत शास्त्रे व त्यांची परिभाषा आपण आपल्या मातृभाषेत आणू शकणार नाही, ही आपली समजूत निराधार आहे. अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या जपानसारख्या राष्ट्राने देखील आपली प्रगती आपल्या मातृभाषेतूनच साधली. कोणत्याही परकीय भाषेचा पांगुळगाडा त्यांनी पत्करला नाही.

मुळातच असा प्रश्न निर्माण होतो की, 'आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का?' आपल्या देशाचा आणि आपला स्वत:चा व्यक्तिगत विकास आपणांस साधायचा असेल तर मातृभाषेचे ऋण मानले पाहिजे व या मातृभाषेतील थोर ठेवा जतन केला पाहिजे.

Similar questions