'मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही' या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
Answers
Answer:
please refer to the above attachment for your answer dear army
मैत्री ही अमूर्त भावना आहे. ते एक नाते आहे. भौतिक वस्तूंप्रमाणे ती आपल्याला नजरेला दिसत नाही; परंतु असे असले, तरीही आपण तिचे अस्तित्व नाकारू शकत नाही. आपल्या मित्राला संकटसमयी साथ देणे, त्याच्यासोबत तासन्तास गप्पा मारणे, प्रत्येक गोष्ट त्याला सांगण्याची इच्छा होणे या सर्वांतूनच मैत्री जाणवत असते. मित्र अगदी रोज सहवासात नसला, कित्येक महिने भेट झाली नसली, तरी त्याच्याविषयी वाटणाऱ्या स्नेहातून, काळजीतून मैत्रीचे नाते जाणवत असते. म्हणजेच मैत्री ही नेमकी दाखवता येत नाही, परंतु तिचे अस्तित्व मात्र जाणवत राहते.
जन्मतः प्राप्त झालेली नाती हि आपल्याला स्वीकारावी लागतात. कधी कधी ती नाती आपल्याला लादल्यासारखी वाटतात. मात्र मैत्रीचे नाते हे सूक्ष्म नाते असते. ते आपण सहवासाने व आपल्या आवडीने निर्माण करतो. मित्राचे अस्तित्व दाखवता येते पण मैत्री हे नातं दाखवता येत नाही. ते दाखवणे अशक्य असते तरीही ते नाते आहे ते मान्य करावेच लागते.
#SPJ5