म्टी साजरा
साजरा देण्यातमा वाकिया
वर्णन करणार पापलावी मतलेल्या
मोठ्या ब
Answers
Explanation:
ग्लोबल न्यूज नेटवर्क | दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. मात्र या वर्षी हा सन 15 जानेवारीला साजरा केल जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो. मात्र अनेकांना या सणाचे महत्त्व माहीत नसते. संक्रांत म्हणजे काय? आणि या संक्रांतीला ‘मकर संक्रांत’ असं का म्हणतात. हा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीविषयी विशेष माहिती सांगणार आहोत.
संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे असा त्याचा अर्थ होतो. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते त्याला मकर संक्रांती असे म्हटले जाते. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असतो. यानंतर दिवस हळू हळू मोठा होत जातो.
मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्वही आहे. या दिवसाच्या आधीची रात्र मोठी असते. तर दिवस हा लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. यानंतरपासून रात्र लहान आणि दिवस मोठा होत जातो. यासोबतच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होतो. तसेच उष्णता वाढायला सुरुवात होते. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हटले जाते. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे. तसेच या दिवशी तीळमिश्रीत पाण्याने स्नान केले जाते.
तीळ गुळाचे महत्त्व
मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते. तसेच यामागे वैज्ञानिक कारणही असते. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तसेच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे.
संक्रांतीचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे थोरामोठ्याचे आशीर्वाद घेणे. संक्रांतीला तिळगूळ वाटून नात्यांमधील गोडवा आणखी वाढवा, यासाठी ‘तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला’ असा संदेश थोरामोठ्यांकडून दिला जातो. ‘माणसं तोडू नका तर माणसं जोडत जा’ हाच संदेश हा सणाच्या माध्यमातून दिला जातो.