५) मृत समुद्र म्हणजे काय?
Answers
Answered by
5
answer:
dead sea means मृत समुद्र
explanation:
मृत समुद्र हा इस्राएल व जॉर्डन यांच्या दरम्यान पसरलेला एक भूवेष्टित समुद्र आहे. भौगोलिक दृष्टीने हा समुद्र वस्तुतः तलाव प्रकारात मोडतो. ३३.७ % एवढी, म्हणजे सर्वसाधारण समुद्राच्या पाण्यापेक्षा ८.६ पट अधिक क्षारता असलेला हा समुद्र जगातील सर्वाधिक खारट जलाशयांमध्ये गणला जातो. जिबूतीतील लाक अस्साल, तुर्कमेनिस्तानातील गाराबोगाझ्गोल असे मोजके जलाशय मॄत समुद्रापेक्षा अधिक खारे आहेत. या क्षारतेमुळे एकपेशीय प्राण्यांशिवाय इतर कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे यास मृत समुद्र असे म्हणतात. मृत समुद्र ६७ कि.मी. लांब व १८ कि.मी. रुंद विस्ताराचा असून जॉर्डन नदी ही या समुद्रास येऊन मिळणारी मुख्य नदी आहे. मृत समुद्र सर्वसाधारण समुद्र सपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली आहे. याची खोली ३०६ मीटर आहे.
Similar questions
Geography,
5 hours ago
Science,
5 hours ago
Math,
10 hours ago
English,
8 months ago
Accountancy,
8 months ago