Science, asked by ismailmasuldar2, 11 months ago

मंद हालचाली आणी शिघ्र हालचाल​

Answers

Answered by divya14321
1

Answer:

भौतिकीच्या पद्धती वापरून केलेला पृथ्वीचा अभ्यास. भूविज्ञानाच्या अभ्यासात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आणि घटनांचे प्रत्यक्ष परीक्षण करून त्यावरून निष्कर्ष काढतात, भूभौतिकीमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाशी ठेवलेल्या उपकरणांनी मापने घेऊन त्यांच्या आधारे भूपृष्ठखालील खोल जागी, तसेच वातावरणात कित्येक किमी. उंच जागी असणाऱ्या पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांविषयीचे निष्कर्ष काढले जातात.

भू भौतिकीमध्ये हजारो अंश सेल्सिअस तापमानाच्या आणि वातावरणीय दाबाच्या कित्येक लक्ष पट इतका दाब असलेल्या पृथ्वीच्या गाभ्यापासून तो कवचातील भूखंड, सागरांचे तळ, कवचासभोवतीचे कित्येक किलोमीटर जाडीचे वातावरण या सर्वांच्या अभ्यासाचा समावेश होतो. यांतील अभ्यासाचे विषय प्रत्यक्ष प्रायोगिक निरीक्षणांसाठी हाताळता येण्याजोगे नसल्यामुळे पृष्ठभागाशी काही मर्यादित क्षेत्रात केलेल्या भौतिक मापनांच्या गणिती अर्थबोधनाने पृथ्वीच्या विविध अंगोपांगाची माहिती मिळवावी लागते. पृथ्वीच्या याच अंगोपांगांच्या रासायनिक अभ्यासाला भूरसायनशास्त्र हे नाव आहे.

भूविज्ञानाच्या विविध शाखांचा अभ्यास करण्यासाठी ज्या प्रकारे भूभौतिकी तंत्राचा वापर केला जातो त्यानुसार भूभौतिकाचे पुढील उपविभागांत वर्गीकरण करतात :

(१) भूगणित : पृथ्वीची आकृती व गुरूत्वाकर्षण यांचा उपत्तीसह अभ्यास;

(२) भूकंपशास्त्र : नैसर्गिक अथवा कृत्रिम भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या तरंगांच्या अभ्यासाने पृथ्वीच्या संरचनेची व अंतर्भागाची भौतिक माहिती मिळविणे ;

(३) जलविज्ञान व भूमिजलविज्ञान : पृथ्वीच्या पृष्ठभागी, वातावरणात व भूपृष्ठानजीकच्या खडकांच्या उथळ भागात होणारा पाण्याचा (बर्फ व हिम यांसह) संचय, वहन व अभिसरण यांचा अभ्यास, तसेच हिमनद्यांमुळे गतकाळात झालेली भूपृष्ठाची धूप व विरूपण (रूप बदलणे) यांना कारणीभूत असणारी यंत्रणा समजण्याच्या दृष्टीने सध्याच्या हिमनद्यांचा करण्यात येणारा अभ्यास;

(४) महासागरविज्ञान : महासागराच्या तळाचा आकार, संरचना व तेथे होणाऱ्या हालचाली, तेथे साचणारे निक्षेप (द्रव्याचे साठे), सागरी प्रवाह, लाटा, भरती-ओहोटी, सागरी पाण्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म आणि सर्वांचा सागरी जीवसृष्टीशी असणारा संबंध यांचा अभ्यास ;

(५) वातावरणविज्ञान : पृथ्वीच्या पृष्ठभागानजीकच्या जलवायुमानातील (दीर्घकालीन सरासरी हवामानातील) फेरबदलास कारणीभूत होणाऱ्या वातावरणाच्या थरांतील हालचाली व घटक यांचा अभ्यास; तसेच वातावरणाच्या निरनिराळ्या उंचीवरच्या थरांतील हवेचे घटक, त्यांचे भौतिक गुणधर्म, सूर्यापासून तसेच बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणारी विद्युत्चुंबकीय व इतर प्रारणे (तरंगरूपी ऊर्जा), ही प्रारणे व पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र यांचा परस्परांवर होणारा परिणाम (उदा., चुंबकीय वादळे) इत्यादींचा अभ्यास;

(६) भूचुंबकत्व : पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा उगम, त्याचे भूपृष्ठावरील वितरण, चुंबकीय क्षेत्रात जागोजागी आणि वेळोवेळी होणारे बदल, तसेच पूर्वीच्या कालखंडांत तयार झालेल्या खडकांत आढळून येणारे त्या काळच्या चुंबकीय क्षेत्राचे अवशेष;

(७) पृथ्वीच्या अंतर्भागातील उष्णतेचा अभ्यास : पृथ्वीच्या कवचापासून गाभ्यापर्यत उष्णतेचे वितरण, उष्णतेचा उगम, उष्णता वहन व वहनाच्या प्रमाणात होणारे फेरबदल, शिलारसनिर्मिती, ज्वालामुखी क्रिया इत्यादींचा अभ्यास;

(८) पृथ्वीच्या घन कवचात व त्याखालच्या दुर्बल प्रावरणाच्या (कवच व गाभा यांच्या दरम्यानच्या सु. ३,४८० किमी. खोलीपर्यंतच्या पृथ्वीच्या भागाच्या) वरच्या भागात होणाऱ्या मंद तसेच आकस्मिक हालचाली, कवचाचे विरूपण, घड्या पडणे, विभंजन (तडे पडणे), गिरीजनन (पर्वतनिर्मिती), खंडांचे वहन इत्यादींचा अभ्यास.

Similar questions