मेंदू ताजा तवाना ठेवा.
शेवटी डा हे अक्षर येणारे फक्त ३अक्षरी शब्द सांगा.
१)तोंडाचा खाण्यासाठीचा भाग
२)भिंतीतील मोकळी जागा
३)याचा रंग तीन दिवस
४)पावसाळी पवित्र वनस्पती
५)रतीब/गरमी
६)रंग बदलू प्राणी
७)ओलावारहित
८)वस्त्र
९)अधोमुख
१०)एक मंगल वाद्य
११)कडीचा साथी
१२)एक मळखाऊ रंग
१३)वक्र
१४)जादा रुंद
१५)वेढा
१६)शाहिरी कवन
१७)बिच्चारा
१८)तगादा
१९)कुंकवाची डबी
२०)बैलगाडी
२१)हाडांचा सापळा
२२)निकाल
२३)एक पक्षी
२४)नांगीदार पाणजीव
२५)एक शेंगभाजी
२६)लोकप्रिय खाद्य पदार्थ
२७)भांडण
२८)पहाट आरती
२९)ठोकण्याचे हत्यार
३०)पावलाचा पुढचा भाग
३१)भाजलेली ज्वारीची कणसं
३२)नाकखुपसू
३३)अत्यल्प वस्त्रधारक
३४)एक लोकन्ऋत्य
३५)एक केशरचना
३६)साधाभोळा
३७)केतकी
३८)जाडंभरडं सुती
३९)पोटातील कळा
४०)मूर्ख,बिनडोक
४१)मिरचीचे व्यंजन खरादा
४२)पोक असलेला
४३)पहाटेचा आकाशरंग
४४)डाका
४५)हा पैशाचा किंवा काचेचा होतो.
Answers
Answered by
1
Answer:
kya likhiye ho bhaii??
Answered by
3
शेवटी डा हे अक्षर येणारे फक्त ३अक्षरी शब्द सांगा.
१) जबडा २) कोनाडा ३) तेरडा ४) आघाडा ५) उकाडा
६) सरडा ७) कोरडा ८) कपडा १०) चौघडा ११) कोयंडा
१२) करडा १३) वाकडा १६) पोवाडा १८) लकडा १९) करंडा
२०) छकडा २१) सांगाडा २२) निवाडा २३) कोंबडा २४) खेकडा
२५) घेवडा २६) चिवडा २७) बखेडा २८) काकडा २९) हातोडा
३०)चवडा ३१) हुरडा ३२) चोंबडा ३३) उघडा ३४) भांगडा
३५) आंबाडा ३६) भाबडा ३७) केवडा ३९) मुरडा ४०) वेडा
४१) खरडा ४२) कुबडा ४३) तांबडा ४४) दरोडा ४५) चुराडा
Similar questions