India Languages, asked by armygirlforever07, 5 months ago


मुद्दे -एक पोपट -झाडावर राहणे- झाड सुकणे -इतर पक्ष्यांचे
दुसरीकडे जाणे- पोपटाचे तेथेच राहणे -इंद्राचे आगमन झाड न
सोडण्याचे कारण विचारणे- पोपटाची मातृभक्ती- इंद्राचा वर -
झाडात जीव ओतणे- तात्पर्य.
A story writing of Marathi
my challenge to everybody....​

Answers

Answered by aditibhopale33
12

Explanation:

एका जंगलात एका टेकड़ी वर एक वडाचे खूप मोठे झाड होते. त्यावर सर्व प्रकार चे पक्षी राहत होते. सर्वाना ते झाड खुप आवडायचे, परंतु एका वर्षी भयंकर ऊन्हाळा पडला आणि सर्वत्र झाडे सुकायला लागली त्यामुळे सर्व प्राण्यांचे व पक्षांचे हिरवळी व पाण्याच्या शोधात पलायन सुरू झाले त्या भयंकर ऊन्हात ते वडाचे झाडपण सुकून गेले त्यामुळे त्या झाडावरील सर्व पक्षी झाड सोडून जायला लागले परंतु त्या झाडावर राहणारा एक पोपट ते झाड सोडून गेला नाही तर तो त्याच वाळलेल्या झाडावर राहु लागला.

हे सर्व देवांचा राजा इंद्र स्वर्गातून पाहत होता त्याला पोपटाचे नवल वाटले व पोपटाची दया येऊन पोपटाला समजावयाला इंद्र झाडाजवळ प्रकट झाले परंतु पोपट कुणाचेच ऐकायला व झाड सोडुन जायला तयार नव्हता तेव्हा इंद्राने झाड सोडून न जाण्याचे कारण विचारले तेव्हा पोपट म्हणाले संकटात कोणी आपल्या आईला सोडून जातात का? मी या झाडावर लहानाचा मोठा झालो हे माझ्या करीता फक्त एक झाड नसुन ही माझी आई मी या माझ्या आईच्या कुशीत मरुन जाईल पण मी सोडून जाणार नाही

इंद्राला पोपटाच्या हट्टा समोर व मातृभक्ती समोर झुकावे लागले व प्रसन्न होऊन देवराज एक वर मागण्यास पोपटाला सांगतो तेव्हा पोपट त्या वाळलेल्या झाडात जीव ओतण्यास व झाड पुर्ववत करण्याबाबत विनंती करतो त्याप्रमाणे इंद्र वर देऊन अंतर्धान पावतात.

पोपट व ईतर पक्षी त्या झाडावर आनंदात राहु लागले.

तात्पर्य **

सुखाच्या वेळेस सर्वच मदद करतात रे परंतु दुःखाचे वेळेस कुणीही धाऊन येत नाहीत.

Friend in need is a friend i indeed.....!!

Similar questions