४.माध्यमभाषया उत्तरत।
"क्रियासिद्धिः सत्त्वे भवति' इति सूर्यस्य उदाहरणेन
स्पष्टीकुरुत ।
Answers
Answered by
5
Answer:
सुभाषितांचा संदर्भ लक्षात घेऊन सूक्तींचा अर्थ जाणून घेतल्यास नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व विकसित केले जाऊ शकते. ‘क्रियासिद्धिः सत्त्वे भवति,’ हे सुभाषित सूर्याच्या उदाहरणाने महान लोकांचे आंतरिक सामर्थ्य दर्शविते. सूर्य दररोज, सापांनी नियंत्रित सात घोडे जोडलेल्या, एकच चाक असलेल्या रथातून, निराधार मार्गावरुन पायाने विकलांग अशा सारधीबरोबर अनंत अशा आकाशाच्या शेवटापर्यंत जातो.
(जसे) महान लोकांच्या कार्याची पूर्तता त्यांच्यातील सत्त्वाने (सामर्थ्याने) होते. इतर साधनांनी) नाही. सूर्य सर्व बाजूंनी प्रतिकूल गोष्टींनी वेढला असला तरी आकाशाच्या अंतापर्यंत पोहोचतो. महान लोकही सर्वतोपरी प्रतिकूल गोष्टींचा सामना करत कार्य पूर्णत्वास नेतात.
Similar questions