English, asked by adarshsanjayyadav, 4 months ago

मोवाईलन्चे फायदे तोटे मलिहा.​

Answers

Answered by shravanikadam1308
0

Answer:

मोबाईलचे फायदे व तोटे पुढीलप्रमाणे:

Explanation:

मोबाईलचे फायदे:

•मोबाईलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो.

•आज कालच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमुळे घर बसल्या अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे.

•तुम्ही मोबाईल मध्ये मनोरंजनासाठी गाणी ऐकू शकतात, गेम खेळू शकतात व चित्रपट पाहू शकतात.

•आज कालचे मोबाईल स्लिम असल्याने तुम्ही त्यांना खिश्यात ठेवून कुठेही जाऊ शकतात.

•मोबाईल फोनच्या कॅमेराने तुम्ही फोटो, व्हिडिओ बनवू शकतात.

मोबाईलचे तोटे:

•मोबाईल फोन मधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला हानीकारक असतात, म्हणून कामापेक्षा जास्त वेळ मोबाईल धरून बसू नये.

•मोबाईल इंटरनेट चे भाव भरपूर आहेत या मुळे प्रती माह जास्तीचे पैसे खर्च होतात.

•आजकालच्या तरुणांना अति मोबाईल वापराची सवय लागली आहे, सोशल मीडियाच्या अधिक वापर केल्याने ते वाईट रस्त्याला लागू शकतात.

•लहान मुले मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ वाया घालवतात. यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.

•प्रति मोबाईल वापराने बुद्धी कमजोर आणि एकाग्रता कमी होते.

Similar questions