मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध
Answers
Answer:
या, वाट सरूंनो या. या माझ्या सावलीत क्षणभर विसावा घ्या. तुम्हांला खूप काही सांगावं, असं माझ्या मनात येतंय. ऐकताय ना तुम्ही? ऐका तर मग !
तुम्हांला आता मी हा असा महावृक्ष दिसतोय. आज माझं वय शंभराच्या वर गेलेलं आहे. खरं तर जन्माच्या वेळी मी अगदी लहानसं रोपटं होतो. हळूहळू मोठा होत गेलो. काही समजूतदार व्यक्तींनी माझ्या खोडाभोवती छानसा पार बांधला. तुम्ही आता बसलाय ना पार! येणारा जाणारा वाटसरू त्यावर अगदी सहज क्षणभर तरी विसावतो. माझ्या सहवासात त्याच्या जिवाला थोडंतरी सुख मिळतं. येथे बायका मुलं, तहेत हेचे लोक यांची सतत वर्दळ असते. मुलं उल्हासाने बागडतात. बायका आपापल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करतात. काही उत्साही माणसे तावातावाने वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. कित्येक चळवळ्या माणसांनी आखलेल्या समाजसुधारणेच्या योजना मी ऐकल्या आहेत. माझ्या अंगाखांदयांवर बागडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट मी ऐकतो आणि या एका जागी स्थिर राहूनही मला देशोदेशीच्या हकिकती कळतात. माणसांच्या कितीतरी l पिढ्या मी पाहिल्या आहेत. त्यामुळे माणसांच्या सुखदुःखांचा मी साक्षीदारच बनलो आहे.
आम्हां वृक्षांना माणूस हा प्राणी खरोखरच खूप प्रिय बनलेला आहे. त्यामुळे आम्ही माणसाला शक्य ती सर्व मदत करतो. आमचा संपूर्ण देह माणसाच्या पूर्ण उपयोगाला येतो. तहेत हेच्या चवदार फळांचा आस्वाद आम्ही माणसाला देतो. पानांचेही कितीतरी उपयोग आहेत. आमच्या फांदया खोड यांचा सरपणासाठी, बांधकामासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, कागद तयार करण्यासाठी उपयोग करू देतो. आम्ही हवा शुद्ध ठेवतो, जमिनीतील पाण्याचे स्रोत धरून ठेवतो. त्यामुळे विहिरी, नदयानाले यांना पाण्याचा पुरवठा होतो. म्हणजे आम्ही पर्यावरणाचा समतोल राखतो. यात आमचा फायदा काय? काहीच नाही आम्ही हे सारं तुमच्यासाठी करतो.
तुम्ही माणसं मात्र कृतघ्न! तुम्हांला मदत करणा या माझ्यासारख्या मित्रांवरच कुहाडीचे घाव घालता. केवळ तात्कालिक फायदयासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही माणसे बेसुमार जंगलतोड करता. खरं म्हणजे याचे पुढे होणारे गांभीर परिणाम त्यांच्या समातच येत नाहीत. आज ना उदया ते त्यांना, त्यांच्या मुलाबाळांना भोगावे लागणार आहेत आताच अनेक ठिकाणी कधी कधी भीषण दुष्काळ पडतो. काही भाग व्या कर्माचीच फले आहेत. हे लक्षात घेतलं नाही, तर आमच्याबरोबरच जीवसृष्टीच नष्ट होईल. तेव्हा हे वाटसरूनो, तुम्ही हे लोकांना समजावून सांगाल का?