मी वृक्ष झालो तर मराठी निबंध 10 ते 15 ओळीत लिहा.
Answers
Answer:
मी झाड झालो तर या पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान सजीव गोष्ट असल्याचा अभिमान मला असेल. निसर्गाची पर्यावरणाची शोभा वाढवण्याचे महत्त्वाचं काम माझ्याकडे असेल. मी झाड झालो तर निरनिराळे रंगबिरंगी पक्षी माझ्या कडे आकर्षित होतील.
मला लागलेली रंगीबेरंगी फुले, फळे, हिरवी पाने पाहून सर्व पक्षी माझ्या आश्रयाला येतील. मी झाड झालो तर निसर्गातील सर्व सजीवांना थंडगार सावली देण्याचं काम मी करेन. मी झाड झालो तर वन्यप्राणी, पक्षी जसे माकडे, खारुताई, सुतारपक्षी, पोपट माझ्या फांद्यावर येऊन बसतील.
Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh
Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh
आकाशात घिरट्या घालून बसलेले पक्षी माझ्या झुपकेदार पानांच्या डोलीत क्षणभर विश्रांती घेतील, सुंदर फळांचा आस्वाद घेतील. बागेतील चिमणा चिमणी माझ्या फांद्यावर सुंदर घरटे बनवतील आणि चिमुकल्यांना घरट्यामध्ये ठेवून दूर अन्नाच्या शोधात निघून जातील आणि पुन्हा संध्याकाळ होण्याच्या अगोदर आपल्या घरट्यात येऊन चोचीने पिलाला घास भरवतील.
मी झाड झालो तर हे सर्व सुंदर दृश्य हृदयाला घाव घालणारे माय लेकरांचं नातं मला पहायला मिळेल. मी झाड झालो तर कोकिळा माझ्या हिरव्यागार पानांच्या डोलीत येऊन गोड गाणे गाईल आणि कोकिळेने गायलेल सुंदर गाणं मला खूप जवळून ऐकता येईल व अनुभवता येईल. मी झाड झालो तर निसर्गातील सूक्ष्म हालचाली मला जवळून पाहता येतील. मानवाकडून होणार्या वन्यप्राण्यांच्या हत्यांचा एकमेव साक्षीदार मी असेन. मी झाड झालो तर न बोलताही सर्वकाही अनुभवण्याचे भाग्य मला लाभले.