मी यंत्रमानव झालो तर या विषयावर निबंध लिहा.
Answers
Answer:
यंत्रमानवाला आज्ञावली प्रमाणे बुद्धीमत्ता असते. थोडक्यात यंत्रांची बुद्धिमत्ता म्हणजे मनुष्याने तयार केलेल्या आज्ञावल्या असतात. परंतु नवीन आंतरजाला जोडलेले यंत्रमानव आपली माहिती स्वतःच शोधतील असे विकसित होत आहेत. तसेच आज्ञावली लिहिणाऱ्या आज्ञवल्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे यंत्रमानवाला आवशयक असलेल्या आज्ञवल्या आपोआप विकसित होत जातील अशी शक्यता आहे. ही बुद्धीमत्ता वापरून लढाई करणारे यंत्रमानव सैनिक विकसित करण्याचा प्रयत्न देशोदेशीचे संरक्षण विभाग व प्रयोगशाळा करत आहेत. यामुळे मानवरहित युद्ध यंत्रणा विकसित होऊ शकेल. हे स्वतः प्रगती करत नाहीत कारण प्रगतीसाठी तर्क आणि उस्फुर्तता या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. त्या यंत्रात नसतात. तसेच यंत्रमानवाला स्वत्वाची जाणीव नसते.
Explanation:
यंत्रमानव ही संगणकाच्या पुढची पायरी आहे. खरे म्हणजे फ्रीज, टी.व्ही., दूरध्वनी या साऱ्या रूपांत सुप्तावस्थेत तो आपल्या घरात आलेला आहेच. पण यंत्रमानव' हे यंत्राचे जास्त ठळक रूप आहे. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने, यंत्रमानव आणि मानव परस्परांवर नियंत्रण ठेवू शकणार आहेत. यंत्रमानव तुमची अनेक कामे करणार आहे. तो तुमच्या करमणुकीसाठी टी. व्ही. चालवील, परस्परांचे निरोप देईल, वस्तू जागच्या जागी ठेवील, त्या वस्तू तुम्हांला हव्या असतील तेव्हा तुमच्यापुढे हजर करील.
थोडक्यात,अत्यंत अचूक व अत्यंत नियमितपणे वेळेवर घरातील सर्व प्रकारचे कामे करणारा बुद्धिमान नोकर आपल्याला उपलब्ध होणार आहे. केवळ घरातच त्याचा पराक्रम दिसेल असे नाही, तर युद्धभूमीवर, अंतराळात, समुद्रतळाशी, खाणीमध्ये अशा ज्या ज्या ठिकाणी माणसाला काम करणे कठीण आहे वा धोकादायक आहे,